AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वंचित’ला धक्का, गोपीचंद पडळकर भाजपमध्ये घरवापसीच्या तयारीत?

सांगलीतील जत किंवा खानापूर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर भाजपच्या तिकटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

'वंचित'ला धक्का, गोपीचंद पडळकर भाजपमध्ये घरवापसीच्या तयारीत?
Follow us
| Updated on: Sep 24, 2019 | 8:47 AM

सांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजपकडून हादरे मिळत असतानाच आता वंचित बहुजन आघाडीलाही मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर भाजपमध्ये (VBA Gopichand Padalkar may join BJP) घरवापसी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगलीतील जत किंवा खानापूर विधानसभा मतदारसंघातून पडळकर भाजपच्या तिकटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या गोटात गेले. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीच्या कंपूतही चिंतेचं वातावरण दिसत आहे. गोपीचंद पडळकर (VBA Gopichand Padalkar may join BJP) भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. भाजप आणि शिवसेना युतीच्या निर्णयानंतर पडळकर यांच्या भाजपप्रवेशाबाबत निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

पडळकर लोकसभा निवडणुकीतही सांगली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी खानापूर आणि जत मतदारसंघात पडळकर यांना जास्त मतदान झालं होतं.

वाचा- धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हिरोच्या भूमिकेत, ‘धुमस’चा ट्रेलर रिलीज 

भाजपाचा गड असणाऱ्या जतमध्ये सध्या विद्यमान आमदार विलासराव जगताप यांना स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध आहे. शिवाय येथील धनगर समाजाची संख्या अधिक असल्यामुळे पडळकर यांच्या नावाचा पर्याय पुढे आला आहे.

तर खानापूरमध्ये पडळकर यांची मतं निर्णायक ठरणार आहेत. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे अनिल बाबर आमदार आहेत.

पडळकर युती किंवा आघाडीपैकी ज्या गटात जातील त्यांचं पारडं जड होणार आहे. त्यामुळे पडळकर यांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. युती झाली नाही, तरी भाजप आपला उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर यांना खानापूरमधून उभे करु शकते.

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. गोपीचंद पडळकर भाजपमधील धनगर समाजाचे नेते म्हणून महत्त्वाच्या पदावर होते. मात्र काही गोष्टींवरुन बिनसल्याने पडळकरांनी पक्षाला रामराम करत राजीनामा दिला आहे.

लोकसभेवेळी सांगलीत भाजप, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि लक्षवेधी लढत झाली होती. सांगलीत भाजपकडून संजयकाका पाटील, स्वाभिमानीकडून विशाल पाटील रिंगणात होते. संजयकाका पाटील पाच लाख आठ हजार मतं मिळवत विजयी झाले होते. स्वाभिमानीचे विशाल पाटील 3 लाख 44 हजार मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते. तर पडळकरांनाही तीन लाख मतं मिळाली होती.

संबंधित बातम्या 

सांगली : वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात

सांगलीची चुरस वाढली, पडळकरांच्या एन्ट्रीने तिरंगी लढत निश्चित  

पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक.
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?.
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'.
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?.