यंदा बारामती जिंकून दाखवू, मुख्यमंत्र्यांकडून गोपीचंद पडळकरांना उमेदवारी जाहीर

येत्या विधानसभेत काँग्रेस नेते अजित पवार यांच्या विरुद्ध गोपीचंद पडळकर उतरणार (VBA Gopichand Padalkar join BJP) असल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यंदा बारामती जिंकून दाखवू, मुख्यमंत्र्यांकडून गोपीचंद पडळकरांना उमेदवारी जाहीर
Follow us
| Updated on: Sep 30, 2019 | 2:02 PM

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी नुकतंच भाजपमध्ये (Gopichand Padalkar join BJP) घरवापसी केली आहे. त्यांनी घरवापसी केल्यानंतर लगेचच त्यांना बारामतीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली. येत्या विधानसभेत माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अजित पवार यांच्या विरुद्ध गोपीचंद पडळकर उतरणार (Gopichand Padalkar join BJP) असल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आयोजित केलेल्या मेगाभरतीच्या वेळी त्यांनी ही (Gopichand Padalkar join BJP) घोषणा केली.

गोपीचंद पडळकर हा ढाण्यावाघ आहे. ढाण्या वाघाने जंगलाच्या वाघासारखं राहायचं असतं. माझी अशी इच्छा आहे की त्यांनी बारामतीतून उभे राहिले पाहिजे. जर तुमची सर्वांची अनुमती असेल तर मी पक्षाशी बोलतो आणि यावेळी बारामती आपण जिंकून दाखवू असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर (VBA Gopichand Padalkar join BJP) यांच्यासह काँग्रेस नेते काशीराम पावरा यांना भाजप प्रवेश घेतला. “मी भाजपमध्ये पहिल्यापासून कार्यकर्ता म्हणून काम केले आहे,  2014 पूर्वी राज्याला कोणी वाली राहतो की नाही अशी स्थिती उभी राहली होती. पण मुख्यमंत्र्यांच्या रुपात राज्याला गॉड गिफ्ट मिळालं आहे,” असे मत त्यांनी भाजप प्रवेशानंतर व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या मागण्या मान्य केल्या. मी त्यांच्याकडे कोणतीही वैयक्तिक मागणी केली नाही. प्रवेशापूर्वी मी फक्त त्यांना धनगर समाजाची जबाबदारी घ्या एवढंच सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या मागे उभे राहावे एवढीच माझी इच्छा आहे, असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. गोपीचंद पडळकर भाजपमधील धनगर समाजाचे नेते म्हणून महत्त्वाच्या पदावर होते. मात्र काही गोष्टींवरुन बिनसल्याने पडळकरांनी पक्षाला रामराम करत राजीनामा दिला आहे.

लोकसभेवेळी सांगलीत भाजप, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि लक्षवेधी लढत झाली होती. सांगलीत भाजपकडून संजयकाका पाटील, स्वाभिमानीकडून विशाल पाटील रिंगणात होते. संजयकाका पाटील पाच लाख आठ हजार मतं मिळवत विजयी झाले होते. स्वाभिमानीचे विशाल पाटील 3 लाख 44 हजार मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते. तर पडळकरांनाही तीन लाख मतं मिळाली होती.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.