PSLच्या टॉप-10 खेळाडुंची जेवढी एकत्र कमाई तेवढी तर एकट्या विराट कोहली याची सॅलरी, चहल देखील मागे नाही…
IPL vs PSL: पाकिस्तानी क्रिकेट प्रेमी त्यांच्या देशात भरवल्या गेलेल्या पीएसएल स्पर्धेची तुलना आपल्या आयपीएलशी करतात. परंतू ते हे विसरतात की पीएसएलच्या टॉप-१० क्रिकेटपटूंची एकत्र मानधन केले तरी त्याहून अधिक आयपीएलच्या एकट्या विराट कोहलीची कमाई आहे.

टी- २० क्रिकेट लीगचा फॉरमॅटची केव्हा चर्चा होते तेव्हा पहिले नाव इंडियन प्रीमियर लीगचे येते. आयपीएल ही जगात सर्वात पॉप्युलर आणि यशस्वी क्रिकेट स्पर्धा आहे. जगातील कोणतीही टी-२० स्पर्धा याच्या आसपास देखील पोहचू शकत नाही. पाकिस्तानी क्रिकेट प्रेमी मात्र त्यांच्या पीएसएल या टी-२० क्रिकेट स्पर्धेची तुलना आयपीएल सोबत करत आहेत. परंतू सत्यता मात्र भयानक आहे. आयपीएलच्या समोर पाकिस्तानी सुपर लीग ( PSL ) खूपच खुजी ठरावी अशी आहे. याचा अंदाज तुम्ही यावरुनच लावू शकता की पीएसएलच्या टॉप-१० खेळाडूंची मिळून जितकी कमाई होत आहे त्यांच्या पेक्षा किती तरी पटीने मानधन भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएलच्या एका सिझनमधून कमवत आहे.
आयपीएलचे अनसोल्ड प्लेअर पीएसएलचे स्टार
आयपीएलची सुरुवात साल २००८ मध्ये झाली होती. त्यामुळे साल २०१६ नंतर पाकिस्तानात क्रिकेट बोर्डाने देखील पीएसएल भरवणे सुरु केले. या वर्षी आयपीएल आणि पीएसएल एक सिझनमध्ये खेळविल्या जात आहेत. या कारणाने दोन्ही लिगमध्ये खेळाडूंचे परफॉर्मेंस, पैसे आणि बक्षिसाची रक्कम यांची तुलना केली जात आहे. पीएसएलमध्ये एकतर सर्व परदेशी खेळाडू असे आहेत ज्यांना आयपीएलमध्ये जागा मिळाली किंवा लिलावात विकले गेले नाहीत. उदाहरण द्यायचे झाले तर गेल्यावर्षी आयपीएलमध्ये खेळणारे डेव्हीड वॉर्नर याच्यावर यंदा कोणी बोली लावली नाही. म्हणजेच वॉर्नर आयपीएलमध्ये अनसोल्ड राहीला. हा वॉर्नर मात्र पाकिस्तानाच्या पीएसएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
वॉर्नर मिळाले 2.57 कोटी
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हीड वॉर्नर पीएसएलच्या कराची किंग्स टीम सोबत खेळतो. वॉर्नर याला कराची किंग्स याने २.५७ कोटी भारतीय रुपयात विकत घेतले आहे. पीएसएलचा दुसऱ्या क्रमांकाचा महागड्या खेळाडूंच्या शर्यतीत ९ खेळाडूंमध्ये टाय आहे. बाबर आजम, फखर जमान, शाहीन अफरीदी, डेरिल मिचेल, सॅम अयूब, नसीम शाह, मोहम्मद रिजवान, शादाब खान आणि मॅथ्यू शॉर्ट यांना १.८८ – १.८८ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.




10 खेळाडूंचा एकूण, पगार १९.४९ कोटी
पीएसएलच्या टॉप-१० खेळाडूंना एकूण १९.४९ कोटी रुपये मिळतात. तर आयपीएलच्या खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाशी जर याची तुलना केली तर पाहा काय आकडे आहेत. भारतीय टी-२० लीग मधील किमान ६ खेळाडूंची सॅलरी २० कोटीहून अधिक आहे. यात यामध्ये ऋषभ पंत ( ₹ २७ कोटी ), श्रेयस अय्यर ( ₹२६.७५ कोटी ), वेंकटेश अय्यर ( ₹ २३.७५ कोटी) आणि हेनरिक क्लासेन ( ₹ २३ कोटी), निकोलस पूरन (₹२१ कोटी) आणि विराट कोहली ( ₹२१ कोटी) यांचा समावेश आहे.