फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान, लागवडीपासून काढणीपर्यंतची काय आहे प्रक्रिया?

भाऊसाहेब फुंडकर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान मिळणार आहे. मात्र, याकरीता काय प्रक्रिया आहे व कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात याची माहिती आपण घेणार आहोत.

फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान, लागवडीपासून काढणीपर्यंतची काय आहे प्रक्रिया?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 11:48 AM

मुंबई : बागायती शेती  (horticulture area) शिवाय उत्पादनात वाढ होत नाही ही बाब आता शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्याही निदर्शनास आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न (agricultural production ) वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हे (State Government) सरकार देखील करीत आहे. याकरिता काही टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळवून आधार देण्याचा प्रयत्न हा सरकारचा राहिलेला आहे. मात्र, भाऊसाहेब फुंडकर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान मिळणार आहे. मात्र, याकरीता काय प्रक्रिया आहे व कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात याची माहिती आपण घेणार आहोत.

2018 पासून राज्यातील शेतऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र, योजनेची अंमलबजावणी होण्याच्या अनुशंगाने अनुदान हे तीन टप्प्यात दिले जाते. शिवाय दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यातील अनुदान घेताना फळबागेची लागवड आणि बाग किती योग्य प्रमाणात वाढत आहे याची माहिती कृषी विभागाला देणे गरजेचे आहे.

असा मिळतो अनुदानाचा लाभ

या योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% अशा तीन वर्षात देण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे. तरच राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना अनुदान देण्यात येते. या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोंकण विभागात कमीत कमी 10 गुंठे तर जास्तीच जास्त 10 हेक्टर आणि इतर विभागात कमीत कमी 20 गुंठे तर जास्तीच जास्त 6 हेक्टर. क्षेत्र असणे आवश्यक आहे. फळपिक आणि लागवड केलेल्या झाडांच्या संख्येनुसार अनुदान हे दिले जाते.

या अटींची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार आहे

फळबाग केलेल्या वर्षी किमान 80 टक्के बाग ही जीवंत असल्याचे दाखवावे लागणार आहे. शिवाय दुसऱ्या वर्षी 90 टक्के बाग जिवंत असल्यावरच एकूण अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणार आहे. 7/12 वर फळबाग लागवडीची नोंद करुन घेण्याची जबाबदारी ही लाभ घेण्यार्‍या शेतकर्‍यांची राहणार आहे. लाभार्थी शेतकर्‍यांना अनुदानाची रक्कम ही त्याच्या आधार जोडलेल्या बँक खात्यात सरकार कडून जमा करण्यात येईल. फळबाग जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचाच वापर करणे आवश्यक आहे. या ठीबकसाठीही 100 टक्के अनुदान देण्याची तरतूद यामध्ये आहे.

शेतकऱ्यांना थेट लाभ, काय आहेत आवश्यक बाबी

लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येईल. संस्थात्मक शेतकर्‍यांना कोणताही लाभ मिळणार नाही. याशिवाय शेतकऱ्याचा स्वतःच्या नावाचा 7/12 असणे आवश्यक आहे. शेतीची खातेफोड न झाल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल. 7/12 वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.

अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज

सर्वात आधी राज्य सरकारच्या (mahadbtmahait.gov.in) अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.

वेबसाइट वर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल, त्यावर तुम्हाला ऑनलाईन अॅपप्लिकेशन या लिंक वर क्लिक करावे लागेल,

नंतर तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या वर क्लिक करावे लागेल जसे की तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना 2021 या लिंक वर क्लिक करायचे आहे.

लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऑनलाइन अर्ज उघडेल.

ऑनलाइन अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरावी लागेल.

माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

‘पांढऱ्या सोन्या’च्या खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी खानदेशात

खरीपातील पिकांना ढगाळ वातावरणाचा धोका, शेतकऱ्यांसाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला ?

अनुदानित बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध, या कागदपत्रांची पूर्तता करा अन् बियाणे घ्या..!

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.