पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा, एक मेसेज कोट्यावधी लाभार्थ्यांना
गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान सन्मान योजनेतील 10 वा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार याची चर्चा सुरु होती. पण आता ही तारीख जवळपास निश्चित झाली आहे. पण ही रक्कम जमा होण्यास पुढच्या वर्षीपर्य़ंत लाभार्थ्यांना वाट पहावी लागणार आहे. तारीख जाहीर करण्यासंदर्भातला एक संदेशही लाभार्थ्यांना मिळालेला आहे.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून (PM Kisan Samman Nidhi Yojana) पीएम किसान सन्मान योजनेतील 10 वा हप्ता केव्हा (Farmer) शेतकऱ्यांच्या (Bank Account) बॅंक खात्यावर जमा होणार याची चर्चा सुरु होती. पण आता ही तारीख जवळपास निश्चित झाली आहे. पण ही रक्कम जमा होण्यास पुढच्या वर्षीपर्य़ंत लाभार्थ्यांना वाट पहावी लागणार आहे. तारीख जाहीर करण्यासंदर्भातला एक संदेशही लाभार्थ्यांना मिळालेला आहे. यामध्ये 1 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार असल्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे त्याच दिवशी योजनेचा 10 हप्ता जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नववर्षाचे शेतकऱ्यांना गिफ्ट देण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.
नववर्षाचे शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट
आतापर्यंत 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान सन्मान योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार असल्याचे सांगितले जात होते. पण 1 जानेवारी रोजी शेतकऱ्यांना हा 10 हप्ता देण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या तारखा समोर आल्या आहेत पण नविन वर्षाचे गिफ्ट देण्याच्या तयारीच केंद्र सरकार असल्याचे दिसून येत आहे. या दरम्यान, पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. गतवर्षी 15 डिसेंबर रोजी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता.
देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मिळतोय योजनेचा लाभ
पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत केंद्र सरकारने 11.17 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली आहे. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते. पहला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान करण्यात येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. यंदा मात्र, डिसेंबर महिन्यातला हप्ता जानेवारी महिन्यात मिळणार आहे.
योजनेचे लाभार्थी असाल तर असे करा तुमचे नाव चेक
पीएम किसान योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे. यासाठी प्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर, फार्मर्स कॉर्नर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे. आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादी / Beneficiary list वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकणार आहेत.
कृषी मंत्रालयाचे शेतकऱ्यांना आवाहन
मध्यंतरी नैसर्गिक शेतीच्या कार्यक्रमादरम्यान देशातील सर्व शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन पाहण्यास मिळावे म्हणून एका SMS द्वारे लिंक देण्यात आली होती. आता 1 जानेवारी रोजी होणारा कार्यक्रमही pmindiawebcast.nic.in या लिंकवर पाहू शकणार आहेत.