Success Story: तीन एकरात, तीन वर्षात आंब्यातून 18 लाखाचे उत्पन्न, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला तर वाचा

उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक शेती पध्दतीचा उपयोग नाही तर शेतकऱ्यांनी प्रयोगशील असणे गरजेचे आहे. शेती व्यवसायाला सुरवात करतानाच बिरजदार यांनी हे सूत्र अंमलात आणले होते. त्यामुळेच त्यांनी पारंपरिक शेती पध्दतीला फाटा देत तीन एकरामध्ये केशर आंब्याची लागवड केली होती. अवघ्या तीन वर्षात आंब्याला फलधारणा झाली असून आता हा आंबा सातासमुद्रापार जात आहे.

Success Story: तीन एकरात, तीन वर्षात आंब्यातून 18 लाखाचे उत्पन्न, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला तर वाचा
केशर आंबा
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 10:58 AM

सोलापूर : शेती निसर्गावर अवलंबून, शेतीत काय राम आहे अशी नकारात्मकता ठासून भरलेल्यांसाठी (Solapur Farmer) सोलापूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे. दक्षिण तालुक्यातील दर्गनहळ्ळी येथील केदारनाथ बिरजदार यांनी केवळ (Farming) शेती पध्दतीमध्येच बदल केला नाही तर अधिकच्या उत्पादनासाठी आपली जीवन शैलीच बदलली आहे. 10 हजाराच्या नौकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती व्यवसायात अशी काय प्रगती केली आहे की वर्षाकाठी 18 लाखाचे उत्पन्न हे ठरलेलेच आहे. तीन वर्षापूर्वी त्यांनी 3 एकरामध्ये (Keshar Mango) केशर आंब्याची लागवड केली होती. आज केशर आंब्याची निर्यात होत असून त्यांना यामधून 18 लाखाचा फायदा झाला आहे. केवळ उत्पादनात बदल आणि तंत्रशुध्द पध्दतीने केलेली जोपासणा आज त्यांच्या कामी आली आहे.

फळबागांमधूनच अधिकची उत्पाकता

उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक शेती पध्दतीचा उपयोग नाही तर शेतकऱ्यांनी प्रयोगशील असणे गरजेचे आहे. शेती व्यवसायाला सुरवात करतानाच बिरजदार यांनी हे सूत्र अंमलात आणले होते. त्यामुळेच त्यांनी पारंपरिक शेती पध्दतीला फाटा देत तीन एकरामध्ये केशर आंब्याची लागवड केली होती. अवघ्या तीन वर्षात आंब्याला फलधारणा झाली असून आता हा आंबा सातासमुद्रापार जात आहे. राज्यात केवळ हापूसलाच मागणी असे नाही तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात उत्पादित होत असलेल्या केशर आंब्यालाही तेवढीच मागणी आहे.

नोकर बनण्यापेक्षा मालक होऊन काळ्या आईची सेवा करा

शेती व्यवसयात रात्रीतून यश मिळत नाही तर त्यासाठी अथक परिश्रम आणि वेगळ्या प्रयोगाची गरज आहे. हाच निर्धार करुन केदरनाथ यांनी शेती व्यवसयात पदार्पण केले होते. 10 हजाराची नौकरी करण्यापेक्षा मालक होऊन शेती व्यवसाय केलेला केव्हाही फायद्याचाच असल्याचे बिरजदार यांचे मत आहे. त्यामुळेच नौकरीच्या मागे न लागता शेती व्यवसाय करण्याचा निर्धार केल्याचे बिरजदार यांनी सांगितले आहे. आता वर्षाकाठी 18 लाखाचे उत्पन्न घेत आहेत. शेतीमध्येही पारंपरिक शेतीला महत्व नाही तर फळबागांमधूनच उत्पादन वाढविता येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

केशरला परदेशातून मागणी

फळांचा राजा म्हणले की आपल्यासमोर येतो तो कोकणचा हापूस आंबा. मात्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील केशरलाही तेवढेच महत्व आहे. केशरचा हंगाम हा उशिराचा असला तरी त्याला आता परदेशातून मागणी वाढत आहे. दर्जेदार आंब्याची निर्यात झाल्यानेच प्रतिकूल परस्थितीमध्येही भरघोस उत्पादन मिळाल्याचे बिरजदार यांनी सांगितले आहे. शिवाय तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता शेती व्यवसयातच नवनवीन प्रयोग करणे फायद्याचे ठरणार असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.