Fruit Tree : मराठवाड्यातील 9 गावाच्या शिवारात 20 हजार फळझाडांची लागवड अन् संगोपनही, काय आहे हा अनोखा उपक्रम?

मराठवाडा म्हणलं की ओसाड माळरान आणि दुष्काळाच्या झळा एवढंच काय ते चित्र समोर राहतं. मात्र, आता काळाच्या ओघात विविध उपक्रम आणि निसर्गाची कृपादृष्टी यामुळे चित्र बदलत आहे. हे बदलते चित्र अधिकच रंगतदार करण्यासाठी विविध सामाजिक संस्था देखील पुढाकार घेत आहेत. आता मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील 9 गावांमध्ये तब्बल 20 हजार फळझाडांची लागवड करण्यात आली आहे.

Fruit Tree : मराठवाड्यातील 9 गावाच्या शिवारात 20 हजार फळझाडांची लागवड अन् संगोपनही,  काय आहे हा अनोखा उपक्रम?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 1:49 PM

औरंगाबाद : (Marathwada) मराठवाडा म्हणलं की ओसाड माळरान आणि दुष्काळाच्या झळा एवढंच काय ते चित्र समोर राहतं. मात्र, आता काळाच्या ओघात विविध उपक्रम आणि निसर्गाची कृपादृष्टी यामुळे चित्र बदलत आहे. हे बदलते चित्र अधिकच रंगतदार करण्यासाठी विविध सामाजिक संस्था देखील पुढाकार घेत आहेत. आता मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील 9 गावांमध्ये तब्बल 20 हजार (Promotion of Fruit Trees) फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फळलागवडीचे महत्व कळणार आहे. शिवाय पारंपारिक पिकांपेक्षा शेतकरी आता फळपिकांकडे आकर्षित होणार आहे.

काय आहे उपक्रम ?

एमआयडीसी आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातील 9 गावांमध्ये फळझाडांची लागवड केली जाणार आहे. औद्योगिक भवन येथील मंदार वैद्य, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी तसेच कृषी विज्ञान केंद्रातील डॅा. के.के झाडे, आर के गुप्ता यांच्या माध्यमातून हा अनोखा प्रयोग साकारला जात आहे. याला अंबेलोहळ गावातून सुरवात झाली असून या फळझाडांचा लाभ या गावातील तब्बल 40 शेतकऱ्यांना होणार आहे. केवळ फळझाडांची लागवडच नाही तर 3 वर्ष संगोपनाचीही जबाबदारी यांनी घेतली आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष फळबाग लागवडीकडे आकर्षित करणे हाच उद्देश असल्याचे हेमलता राजपूत यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांनाही मोठा आधार

सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. 9 गावातील शेतकऱ्यांना जे पाहिजे तेच बांधापर्यंत मिळालेली आहे. विविध फळझाडे यामध्ये पेरु, सिताफळ, मोसंबी, लिंबू आदींची लागवड केली जाणार आहे. याकरिता फुलशिवारा, गवळी शिवार, गवळी धानोरा, रांजणगाव, पोळ, गाजगाव, पुरी आसेगाव, अंबेलोहळ, राजोरा या गावातील 60 एकरात 20 हजार फळझाडे लावली जाणार आहेत.

काय उद्देश आहे कॅास्मो फाउंडेशनचा?

मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न या माध्यमातून राहणार आहे. या भागात फळझाडांची संख्या कमी आहे. शिवाय येथील शेतकरी केवळ पारंपारिक पिकांवरच भर देतात. या उपक्रमातून फळझाडांचे महत्व आणि याबद्दलची आवड निर्माण होऊन परिवर्तन करण्याचा प्रयत्न राहणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना यामध्ये आंतरपीकही घेता येणार आहे. फळझाडांची देखरेख, तांत्रिक सल्ला दिला जाणार असल्याचे कृषी विज्ञान केंद्रातील के.के. झाडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे या अनोख्या उपक्रमाचे फळ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काय मिळते हेच पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

sugar cane : परिश्रमाला जोड नियोजनाची, सरकारने नाही पण शेतकऱ्याने करुन दाखवले दुप्पट उत्पन्न

अवकाळी पाऊस बेतला जीवावर, वीज कोसळल्याने 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, रब्बीतील पिकेही आडवी

खरिपातील दोन पिकांच्या विम्याचे झाले काय ? शेतकऱ्यांना तर एक छदामही नाही, अधिकाऱ्यांचेही तोंडावर बोट

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.