Success Story : 10 एकरातील ‘पिंक’ पेरुच्या लागवडीने उजाडली 25 लाखाच्या उत्पन्नाची ‘गुलाबी’ पहाट ; लॉकडाऊनचा असा हा सदउपयोग

जो-तो कोरोनामुळे ओढावलेल्या लॉकडाऊनचा बाऊ करीत असताना या गावातील अॅड सोमेश वैद्य यांच अख्खं कुटूंब हे पेरुची बाग जोपासण्यात दंग होत. ना कोरोनाची भीती ना कोणत्या अफवा. या दरम्यानच्या 18 महिन्यात त्यांनी जो प्रयोग केला त्याचे फलीत म्हणूनच 25 लाखाचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे.

Success Story : 10 एकरातील 'पिंक' पेरुच्या लागवडीने उजाडली 25 लाखाच्या उत्पन्नाची 'गुलाबी' पहाट ; लॉकडाऊनचा असा हा सदउपयोग
पिंक वाणाच्या पेरु लागवडीतून तुळजापूर येथील शेतकऱ्याने 10 एकरामध्ये 25 लाखाचे उत्पन्न घेतले आहे
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 3:46 PM

उस्मानाबाद : प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांनी अनोखा प्रयोग केला तर काय होऊ शकते याची प्रचिती (Tuljapur ) तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील शेतकऱ्याच्या अभिनव उपक्रमामुळे येऊ शकते. जो-तो कोरोनामुळे ओढावलेल्या (Corona Lockdown) लॉकडाऊनचा बाऊ करीत असताना या गावातील अॅड सोमेश वैद्य यांच अख्खं कुटूंब हे (Guava cultivation) पेरुची बाग जोपासण्यात दंग होत. ना कोरोनाची भीती ना कोणत्या अफवा. या दरम्यानच्या 18 महिन्यात त्यांनी जो प्रयोग केला त्याचे फलीत म्हणूनच 25 लाखाचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे. पिंक वाणाच्या पेरुची लागवड करुन त्यांनी हे भरघोस उत्पन्न घेतले आहे.

परिश्रमाला योग्य नियोजनाची जोड

जून 2020 मधे तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावात 5 एकर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डि गावात 5 एकर थाई 7 आणि पिंक सुपर वाण जातीचा पेरू बाग लागवड केली होती. परीश्रमापेक्षा नियोजनाला अधिकचे महत्व देऊन त्यांनी जोपासना केली. याकरिता ड्रिप सिंचन, खते व पाणी झाडास उपलब्ध करून अत्यंत योग्य नियोजन द्वारे 10 हजार पेरू झाडांचे संगोपन केले आहे. शेताला कायम स्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यानी आधुनिक पध्तीने 1 एकर मधे शेततळे बांधले असून 2 विहीरद्वारे मुबलक पाणी साठा केला आहे.

तीन महिन्यांमध्ये 100 टन पेरुचे उत्पादन

18 महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या पेरुच्या उत्पन्नाला आता कुठे सुरवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये 10 एकरातील बागेत त्यांना 100 टन पेरुचे उत्पादन झाले आहे. उस्मनाबाद लातूर बेळगाव, अहमदनगर येथील व्यापारी आणि बाजार समिति मधे विकून 25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. यंदा पेरुला माफक दर असताना देखील पिंक पेरुच्या वाणाची चवच न्यारी असल्याने मागणी अधिक होती. याचा फायदा वैद्य यांना झाला म्हणूनच 25 लाखाचे उत्पन्न शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लॉकडाऊनच्या काळात मजूरांच्या हाताला काम

गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात मजूरांच्या हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली होती. शहरातील नागरिकांनी गाव जवळ करुन पडेल ते काम करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह केला होता. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये अँड सोमेश वैद्य यांनी पेरु बागेत परिसरातील गरजू व्यक्ती आणि महिलांना नियमित रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यामुळे बागेची जोपासना तर झालीच पण अनेकांच्या हाताला कामही मिळाले. अँड. सोमेश वैद्य विधानभवनात भोसरी चे आमदार महेश लांडगे यांचे ते स्वीय सहायक म्हणून कार्यरत आहेत. असे असतानाही त्यांनी मातीशी नाळ कायम ठेवत या प्रयोग केला आणि त्याला यशही मिळाले.

संबंधित बातम्या :

खरिपातील सोयाबीनचा असा झाला उपयोग, शेतकऱ्यांना मिळाले नाही उत्पन्न पण मार्गी लागला जनावरांच्या..

कापूस दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना का व्यापाऱ्यांना? साठवणूक केली मात्र विक्रीचे टायमिंग चुकले..!

Orange fruit: नागपूरी संत्रीची फळगळ रोखण्यासाठी कृषी विभागाचा काय आहे ‘मेगा प्लॅन’, वाचा सविस्तर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.