Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sorghum Crop : त्यांनी सिंमेंटच्या जंगलात ज्वारीचे पीक घतले पण उत्पादनासाठी नाही तर…

वावरात उभ्या असलेल्या पिकावरील एक धान्यही वाया जाऊ नये याची काळजी शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे. ज्वारीचा एक कणही पक्ष्यांच्या तोंडी जाऊ नये म्हणून सध्या शेतकरी हा रात्रीचा दिवस करीत आहे तर दुसरीकडे सिमेंटच्या जंगलात एका शेतकऱ्याने 6 एकरावर घेतलेले ज्वारीचे पीक हे केवळ पक्षांसाठी सोडले आहे.

Sorghum Crop : त्यांनी सिंमेंटच्या जंगलात ज्वारीचे पीक घतले पण उत्पादनासाठी नाही तर...
पिंपरी चिंचवड येथील शेतकरी पोपट जगताप यांनी 6 एकरावर ज्वारीचे पीक घेतले आहे पण उत्पादनासाठी नाही तर पक्षांना खाद्य म्हणून. त्यांच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 3:33 PM

पिंपरी चिंचवड : निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत शेतकऱ्यांचे प्रयत्न आहेत ते उत्पादन वाढवण्याचे. कितीही संकटे आली तरी पिकांच्या सुरक्षतेसाठी सर्वकश प्रयत्न हे शेतकऱ्यांकडून केले जातात. वावरात उभ्या असलेल्या पिकावरील एक धान्यही वाया जाऊ नये याची काळजी (Farmer) शेतकऱ्यांकडून घेतली जात आहे. ज्वारीचा एक कणही पक्ष्यांच्या तोंडी जाऊ नये म्हणून सध्या शेतकरी हा रात्रीचा दिवस करीत आहे तर दुसरीकडे सिमेंटच्या जंगलात एका शेतकऱ्याने 6 एकरावर घेतलेले (Sorghum Crop) ज्वारीचे पीक हे केवळ पक्षांसाठी सोडले आहे. हा मोठा विरोधाभास असून बदलत्या काळाच्या ओघातही पक्ष्यांचा विचार करणारा अवलिया आहे हे पिंपरी चिंचवड येथे समोर आले आहे. विकसित शहर, औद्योगिक नगरी, बेस्ट सिटी अशी बिरुदावल मिरवणाऱ्या पिंपरी चिंचवड मध्ये शेती जवळपास संपुष्टात आलीय. (Fodder for birds) पक्षांसाठी चारा उपलब्ध करुन देण्याची परंपरा ही पिंपळे गुरव येथील पोपट जगताप यांनी कायम ठेवली आहे.

या उपक्रमात वेगळाच आनंद

केवळ यंदाच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून पक्षांसाठी ज्वारी पीक हे ठरलेलेच आहे. यंदा प्रतिकूल परस्थिती असतानाही 6 एकरामध्ये पेरणी केली होती. आता ज्वारी ही चांगलीच बहरात असून यामधून उत्पादनाची अपेक्षा नाही तर पक्ष्यांचेच पोट भरावे हाच उद्देश असल्याचे पोपट जगताप यांनी tv9 शी बोलताना सांगितले आहे. यामध्ये वेगळाच आनंद आहे. तब्बल 6 एकरातील ज्वारीसाठी नियमित वेळा पाणी, मशागत सर्वकाही करुन आता ही ज्वारी पक्षांसाठीच ठेवण्यात आली आहे. ही परंपरा कायम ठेवण्यामध्ये वेगळाच आनंद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

थंडीमुळे ज्वारी बहरात

सध्याच्या वाढत्या थंडीचा परिणाम द्राक्ष आणि केळी बागावरच नाही तर रब्बी हंगामातील हरभरा पिकावर देखील झालेला आहे. मात्र, ज्वारी पिकाची वाढ जोमात असून सध्या ज्वारी पोटऱ्यात असून कणसे लागण्याच्या अवस्थेत आहे. याच दरम्यान, पक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे ही शेतकऱ्यांची भावना असते मात्र, पोपट जगताप हे याकरिता अपवाद आहेत. त्यांच्याकडे जमिन क्षेत्र अधिकचे असून त्यापैकी तब्बल 6 एक्कर हे केवळ पक्ष्यांसाठीच राखीव ठेवत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.

सिमेंटच्या जंगलात 6 एकरात ज्वारी प्लॉट

पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही औद्योगिक नगरी म्हणून आहे. येथे महिन्याला जागेच्या दरात वाढ होता. पण हा पोपट जगताप यांचा 6 एकराचा ज्वारीचा प्लॉट हा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या सिमेंटच्या जंगलात पक्षांची मात्र, गैरसोय होत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून जगताप हे या क्षेत्रातील पीक हे पक्षांसाठी राखीव ठेवत आहेत. तीच परंपरा यंदाही कायम असून माणसांना नाही पण पक्षांना हे ज्वारीचे पीक हक्काचे आहे.

संबंधित बातम्या :

Smart Marathwada: पीक लागवड ते शेतीमालाच्या निर्यातीचा मान मराठवाड्यातील 76 शेतकरी उत्पादक कंपन्यांना, वाचा सविस्तर

Crop Insurance : पीक विम्याचा प्रश्न आता राज्यपालांच्या दरबारी, उस्मानाबादच्या आमदारांची काय आहे भूमिका?

Mango: फळांचा ‘राजा’ निघाला अमेरिकेच्या वारीवर, कशामुळे रखडली होती निर्यात? वाचा सविस्तर

वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना.
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य.
"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.