Akola : शेतकऱ्यांनो कामाला लागा, हरभरा खरेदी केंद्राबाबत सरकारचा मोठा निर्णय

यंदाच्या रब्बीत सर्वात अधिक उत्पादन हरभऱ्याचे घेण्यात आले होते. अधिकच्या उत्पादनामुळे खुल्या बाजारात हरभऱ्याला 4 हजार 500 असा दर आहे तर हमी भाव हा 5 हजार 230 रुपये ठरवून देण्यात आला आहे. 1 मार्च सुरु झालेली खरेदी केंद्र 29 मे ला बंद होणार होते. पण उद्दिष्टपूर्ती आणि पोर्टलची समस्या निर्माण झाल्याने ही खरेदी केंद्र बंद करण्यात आली होती.

Akola : शेतकऱ्यांनो कामाला लागा, हरभरा खरेदी केंद्राबाबत सरकारचा मोठा निर्णय
अकोला जिल्ह्यामध्ये पुन्हा हरभरा खरेदी केंद्राला सुरवात झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 11:25 AM

अकोला : यंदा(Rabi Season)  रब्बी हंगामात हरभऱ्याचे उत्पादन वाढले असताना अचानक (Chickpea Crop) हरभरा खरेदी केंद्र झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. मुदतीपुर्वीच खऱेदी केंद्र बंद झाल्याने हरभऱ्याचे काय करावे असा प्रश्न उपस्थित होत असताना (Akola District) अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारपासून खरेदी केंद्र ही सुरु झाली आहेत. त्यामुळे हरभऱ्याला 5 हजार 300 हा आधारभूत दर मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर टळले आहे पण आता खुल्या बाजारपेठेतीलही दर वाढतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने सुरु केलेले ऑलाईन पोर्टल हे बंद झाल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा खरेदी केंद्रावरत शेतकऱ्यांची वर्दळ होणार हे नक्की.

हरभरा खऱेदी केंद्र अन् शेतकरी

यंदाच्या रब्बीत सर्वात अधिक उत्पादन हरभऱ्याचे घेण्यात आले होते. अधिकच्या उत्पादनामुळे खुल्या बाजारात हरभऱ्याला 4 हजार 500 असा दर आहे तर हमी भाव हा 5 हजार 230 रुपये ठरवून देण्यात आला आहे. 1 मार्च सुरु झालेली खरेदी केंद्र 29 मे ला बंद होणार होते. पण उद्दिष्टपूर्ती आणि पोर्टलची समस्या निर्माण झाल्याने ही खरेदी केंद्र बंद करण्यात आली होती. त्यामुळे शिल्लक हरभऱ्याचे करायचे काय असा सवाल उपस्थित झाला होता. पण जिल्ह्यात पुन्हा खरेदी केंद्र ही सुरु झाल्याने अधिकच्या दराने हरभरा विक्री करता येणार आहे.

उर्वरीत शेतकऱ्यांनाही दिलासा

खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी नोंदणी करुनही अचानक प्रक्रिया बंद केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी झाल्या होत्या. आता जिल्ह्यातील 3 हजार 678 शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्री करता येणार आहे. शिवाय इतर शेतकऱ्यांनाही हरभऱ्याची विक्री करता येणार असून त्यासाठी नोंदणी गरजेची आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, 8 अ, बॅंक पासबुक, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक याची नोंद खरेदी करावी लागणार आहे. 21 मे पासून बंद असलेली खरेदी आता बुधवारपासून सुरु झाली आहेत.

हे सुद्धा वाचा

15 हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट

अकोला जिल्ह्यात बुधवारपासून खरेदी केंद्र सुरु झाले असून आगामी काळात 15 हजार क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसारच आता खरेदी केली जाणार आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांचा माल घेणे शक्य त्यांचीच अधिकृत नोंद केली जाणार आहे. त्यामुळे कोणता गोंधळ तर होणारच नाही पण खरेदी सुरु करण्यापूर्वीच या सूचना दिल्याने शेतकरीही तयारीत राहणार आहेत. केंद्राने हरभरा खरेदी केंद्राबाबत घेतलेला निर्णय अनेक शेतकऱ्यांसाठी फायद्याचा राहणार आहे.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.