Sagar Ratna Success Story : पोट भरण्यासाठी घराबाहेर पडून हॉटेलमध्ये भांडे घासले, आता जयराम बानन बनले ३०० कोटींचे मालक

जयराम बानन यांचा जन्म कर्नाटकच्या उड्डपीमध्ये झाला. ते आपल्या वडिलांना खूप घाबरत होते. १३ व्या वर्षी ते नापास झाले तेव्हा वडिलांनी त्यांना चांगलचं चोपलं.

Sagar Ratna Success Story : पोट भरण्यासाठी घराबाहेर पडून हॉटेलमध्ये भांडे घासले, आता जयराम बानन बनले ३०० कोटींचे मालक
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 3:49 PM

मेहनतीचे फळ एक दिवस मिळतेच. जयराम बानन यांनी जीवनात कधी हार मानली नाही. आज त्यांचा व्यवसाय ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. परंतु, त्यांनी इथपर्यंत येण्यासाठी खूप संघर्ष केला. जयराम बानन यांचे देशात ६० पेक्षा जास्त आऊटलेट आहेत. जेवणासाठी सागर रत्ना रेस्टॉरेंट लोकांच्या पसंतीचं ठिकाण आहे. हा रेस्टहाऊस साऊथ इंडियन पदार्थांसाठी खास लोकप्रीय आहे. जयराम बानन यांनी सागर रत्ना रेस्टारेंट कसा उभा केला. त्याची ही सक्सेस स्टोरी.

वडिलांनी चोपले म्हणून सोडले होते घर

जयराम बानन यांचा जन्म कर्नाटकच्या उड्डपीमध्ये झाला. ते आपल्या वडिलांना खूप घाबरत होते. १३ व्या वर्षी फेल झाले तेव्हा वडिलांच्या हातचा चांगलाच मार खाल्ला. १९६७ मध्ये घरून निघून पोट भरण्यासाठी थेट मुंबईत पोहचले.

तीथं एका हॉटेलमध्ये भांडे घासण्याचे काम केले. त्या मोबदल्यात त्यांना महिन्याला १८ रुपये मिळत होते. त्यांनी मन लावून काम केलं. सहा वर्षांनंतर ते वेटर झाले. त्यानंतर हॉटेलमध्ये मॅनेजर झाले.

दिल्लीला व्यवसायासाठी निवडले

जयराम बानन यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत स्वतःचे रेस्टारंट सुरू करायचे होते. १९७४ मध्ये दिल्लीत आल्यानंतर त्यांनी गाजीयाबादमध्ये सेंट्रल इलेक्ट्रानिक्स लिमिटेडची कँटीन चालवण्याचे काम मिळवले. या कँटिनमध्ये त्यांनी दोन हजार रुपये लावले होते. त्यानंतर त्यांनी साऊथ दिल्लीच्या डिफेंस कॉलनीत १९८६ मध्ये स्वतःचे रेंस्टारेंट सुरू केले.

या रेस्टारेंटचे नाव त्यांनी सागर ठेवले. येथून त्यांनी पहिल्या दिवशी ४०८ रुपये कमावले. त्यांच्या रेस्टारेंटमध्ये ४० लोकं बसू शकत होते. त्यांनी जेवणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे त्यांचा व्यवसाय मोठ्या वेगाने वाढला. चार वर्षानंतर दिल्लीत आणखी एक रेस्टारेंट सुरू केला. नव्या हॉटेलचे नाव रत्न ठेवले. अशाप्रकारे सागर रत्न एक ब्राँड बनला.

विदेशींसाठी सागर रत्नामध्ये आउटलेट

जयराम बानन यांच्या सागर रत्नाने देशातच नाही तर कॅनडा, सिंगापूर, बँकाकमध्येही आउटलेट सुरू केले. त्यांना डोसा किंग म्हणूनही ओळखले जाते. सागर रत्नाशिवाय स्वागत नावाने एक रेस्टारेंट चैन चालवतात. २००१ मध्ये त्यांनी हे सुरू केले. त्यानंतर ते रोज यशाची शिखरं गाठत आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.