Agricultural : कृषी विभागात महाघोटाळा, कॉंग्रेसच्या नेत्याची अधिकाऱ्याविरोधात ‘ईडी’ कडे तक्रार
जलयुक्त शिवार योजनेतील अपहारात गुत्तेदारांपासून ते वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न हे वसंत मुंडे यांच्या तक्रारीवरुन समोर आले होते. आता शेतकऱ्यांचे उत्पादन घटण्यामागे आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यामागेही कृषी विभागातीलच अधिकारी असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे. एवढेच नाही तर खत, बी- बियाणे आणि औषध खरेदीच्या भ्रष्टाचारामध्ये कृषी संचालक दिलीप झेंड यांचा समावेश असून चौकशी करण्यासंदर्भात त्यांनी थेट ईडीकडे तक्रार नोंदवली आहे.
बीड : जलयुक्त शिवार योजनेतील अपहारात गुत्तेदारांपासून ते वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न हे वसंत मुंडे यांच्या तक्रारीवरुन समोर आले होते. आता शेतकऱ्यांचे उत्पादन घटण्यामागे आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यामागेही (Agricultural Department) कृषी विभागातीलच अधिकारी असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे. एवढेच नाही तर खत, बी- बियाणे आणि औषध खरेदीच्या (In corruption) भ्रष्टाचारामध्ये कृषी संचालक दिलीप झेंडे यांचा समावेश असून चौकशी करण्यासंदर्भात त्यांनी थेट (ED) ईडीकडे तक्रार नोंदवली आहे. गेल्या तीन वर्षापासून कृषी विभागातील खत पुरवठा, बियाणे आणि औषध विक्रीमध्ये अपहार होत आहे. त्यामुळे दिलीप झेंड यांच्याबाबत मुंडे यांनी कृषी आयुक्त धीरज कुमार आणि राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडेही तक्रार केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या या विभागातूनच शेतकऱ्यांची फसवणूक होते का? हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
नेमके ईडीकडील तक्रारीत काय आहे?
शेतकऱ्यांचे हित हेच कृषी विभागाचे उद्दीष्ट आहे. मात्र, याच विभागातून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. राज्यात बोगस बियाणे, खत आणि औषध खरेदीमध्येही काळाबाजार सुरु आहे. एवढेच नाही तर हा सर्व कारभार कृषी संचालक दिलीप झेंडे हे त्यांच्या भावा मार्फत चालवल्या जात आहे आहेत. तर यामध्ये दिलीप झेंडे यांच्यासह त्यांची सर्व टीम सहभागी असल्याचा आरोप देखील वसंत मुंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी ह्या कागदावरच राहत असल्याने कुंपनच शेत खातंय का असा सवाल उपस्थित होत आहे. कोकण भागामध्ये देखील, युरिया खताचा गैरवापर दिलीप झेंडे यांच्या सहकार्यातून झाल्याचा आरोप आहे.
..म्हणून ईडीकडेच तक्रार
कृषी सहसंचालक हे सत्तेतील नेत्यांच्या मर्जीतले अधिकारी आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे त्यांना पाठबळ आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे तक्रार करुन काही उपयोग झाला नसता म्हणून थेट ईडीकडेच तक्रार केली असल्याचे वसंत मुंडे यांनी सांगितले आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. दिलीप झेंडे यांना तात्काळ निलंबित करावे अशी देखील मागणी वसंत मुंडे यांनी केली आहे. दरम्यान वसंत मुंडे यांच्या तक्रारी व आरोपावरून राज्याच्या कृषी विभागासह मंत्रिमंडळात देखील, खळबळ उडाली आहे.
घोटाळ्याचे स्वरुप तरी काय?
राज्यभर बोगस बियाणांच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, त्या तक्रारी निकाल्या काढल्या जात नाहीत.गेल्या तीन वर्षात हजारो तक्रारी दाखल झाल्या असून केवळ कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांचा यामध्ये सहभाग असल्यामुळे हा घोटाळा समोर येऊ शकलेला नाही. या सबंध प्रकरणात झेंडे यांचा कसा सहभाग आहे हे देखील कागदपत्रांसह उघड केला जाणार असल्याचा इशारा वसंत मुंडे यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या :
Latur Market : आवक सोयाबीन अन् हरभऱ्याची चर्चा मात्र तुरीची, हंगामाच्या अंतिम टप्प्यात बदलले चित्र?