Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rabi Season : पावसाने सरासरी ओलंडल्याने हरभरा पिकाची टक्केवारी वाढली

खरिपात झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर पावसामध्ये राहिलेले सातत्य याचा परिणाम अजूनही जाणवत आहे. हंगामात पावसाने सरासरी ओलंडल्यामुळेच रब्बीच्या पेरण्या ह्या उशिराने झाल्या. परिणामी वाफसा नसल्याने अधिकचा वेळ लागला आणि आता हरभरा पिकाशिवाय पर्यायच उरला नाही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळेच औरंगाबाद विभागात सरासरीच्या तुलनेत 200 टक्के क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला.

Rabi Season : पावसाने सरासरी ओलंडल्याने हरभरा पिकाची टक्केवारी वाढली
उन्हाळी हंगामातील हरभरा पीक
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 5:15 PM

औरंगाबाद : (Kharif Season) खरिपात झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर पावसामध्ये राहिलेले सातत्य याचा परिणाम अजूनही जाणवत आहे. हंगामात पावसाने सरासरी ओलंडल्यामुळेच (Rabi Season) रब्बीच्या पेरण्या ह्या उशिराने झाल्या. परिणामी वाफसा नसल्याने अधिकचा वेळ लागला आणि आता (Gram Crop) हरभरा पिकाशिवाय पर्यायच उरला नाही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळेच (Marathwada) औरंगाबाद विभागात सरासरीच्या तुलनेत 200 टक्के क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला. त्यामुळे उत्पादनातही मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यात दरवर्षी ज्वारीचे क्षेत्र अधिक असते पण बदललेल्या परस्थितीमुळे पीकपेऱ्यातही मोठा बदल झाला आहे. औरंगाबाद विभागात बीड, परभणी, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश होतो.

तेलबियांवरही शेतकऱ्यांचा भर

कडधान्यांचे दर वर्षभऱ कमी राहिलेले आहेत तर दुसरीकडे तेलबियांच्या दरात कायम वाढ झाली आहे. त्यामुळे रब्बी आणि आता उन्हाळी हंगामात शेतकरी कडधान्यापेक्षा तेलधान्यावर भर देत आहेत. सहा महिने शेतात राबूनही शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हे बदल करीत आहेत. मराठवाड्यात केवळ ज्वारी, हरभरा, गहू यावरच रब्बी अवलंबून असते पण यंदा सुर्यफूल, करडई, मोहरी यामध्ये वाढ झाली आहे.

ज्वारी निम्म्यानी घटली अन् हरभरा दुपटीने वाढला

ज्वारी पिकासाठी काढणीपासून ते मोडणीपर्यंत केवळ कष्टच करावे लागत आहे. यंदा तर 2 हजार 500 पेक्षा अधिकचा दर मिळालाच नाही. त्यामुळे अधिकचे कष्ट आणि उत्पादनात घट यामुळे शेतकरी त्रासून दुसऱ्या पिकाकडे आकर्षित होत आहेत. औरंगाबाद विभागात ज्वारीचे सरासरी क्षेत्र हे 3 लाख 2 हजार हेक्टर एवढे आहे. तर पेरा 2 लाख 36 हजार हेक्टरावर झालेला आहे. तर दुसरीकडे हरभऱ्याची पेरणी ही डिसेंबर अखेरपर्यंत केली जात होती. त्यामुळे लागवड क्षेत्राच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे.

अशी आहे आकडेवारी

औरंगाबाद जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र हे 41 हजार 731 हेक्टर आहे तर यंदा पेरा 51 हजार हेक्टरावर झाला आहे. म्हणजेच सरासरीच्या 121 टक्के पेरणी झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 81 हजार हेक्टर क्षेत्र आहे तर प्रत्यक्षात पेरा 1 लाख 63 हजार हेक्टरावर झालेला आहे. म्हणजेच 201 टक्के क्षेत्रावर झालेला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही अवस्था आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील चित्र यंदा बदललेले आहे. त्यामुळे याचा उत्पादनावर आणि शेतीमालाच्या दरावर काय परिणाम होणार हे पाहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

मजुरीविनाच ऊसतोडीचे काम, नांदेड जिल्ह्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

PM KISAN : बॅंक खात्यावर 10 वा हप्ता अन् नंतर 10 कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर ‘हा’ संदेश…! वाचा सविस्तर

Agricultural University : ‘या’ 9 पिकांना अन् 4 फळांच्या वाणांना मान्यता, कोणत्या कृषी विद्यापीठाचे योगदान? वाचा सविस्तर

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.