Nashik : शेतकरी आंदोलनाचे लोण पसरले, पुणतांब्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांचे धरणे

नाशिक जिल्ह्यातील मुंजवाड येथे धरणे आंदोलन सुरु करण्यापूर्वी परिसरातील 15 गावच्या ग्रामसभेत ठराव संमत करुन आंदोलनाची दिशा ठरवली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर एकमत झाल्यानंतर त्यासंदर्भात आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे. पुणतांब्याच्या आंदोलनाबरोबरच येथील आंदोलनही सुरु झाले असून आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढील चार दिवसांमध्ये आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे.

Nashik : शेतकरी आंदोलनाचे लोण पसरले, पुणतांब्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांचे धरणे
नाशिक जिल्ह्यातील मुंजवाड येथे शेतकऱ्यांनी धरणे आंदलोनाला सुरवात केली आहे.
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 9:29 AM

मालेगाव: अहमदनगर जिल्ह्यातील (Puntamba) पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून रोज वेगवेगळ्या पध्दतीने (State Government) सरकारचा निषेध केला जात आहे. यापूर्वी 2017 मध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला होता. यावेळीही शेतकऱ्यांनी पाठींबा देण्यास सुरवात केली असून नाशिक जिल्ह्यातील सटाण्याच्या मुंजवाड येथेही (Dharna movement) धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील शेतकरी याठिकाणी एकवटले असून शेतकऱ्यांच्या मागण्या ते ठाम आहेत.पुणतांबा येथील किसान क्रांतीच्या आंदोलनाचे पडसाद आता नाशिकच्या बागलाण मध्येही दिसून आले असून बागलाणतालुक्यातील मुंजवाड गावातील शेतऱ्यांनीही आंदोलन सुरू करत साथ साथ दिली आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून प्रशासनाने आंदोलनाची दाखल घेत योग्य निर्णय न घेतल्यास पुढील पाच दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुंजवाडच्या आंदोलकांनी थेट इशारा दिला आहे.

गावामध्ये ठराव अन् धरणे आंदोलन

नाशिक जिल्ह्यातील मुंजवाड येथे धरणे आंदोलन सुरु करण्यापूर्वी परिसरातील 15 गावच्या ग्रामसभेत ठराव संमत करुन आंदोलनाची दिशा ठरवली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर एकमत झाल्यानंतर त्यासंदर्भात आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे. पुणतांब्याच्या आंदोलनाबरोबरच येथील आंदोलनही सुरु झाले असून आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढील चार दिवसांमध्ये आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे. शेतकऱ्यांमध्ये सरकार विरुद्ध प्रचंड आक्रमकता दिसून येत आहे.

अन्यथा रास्तारोको

सबंध राज्यातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुणतांबा येथे आंदोलनाला सुरवात झाली असली तरी यामधील मागण्या ह्या सर्व राज्यभरातील शेतकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे आता राज्यभर आंदोलनाला सुरवात होत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंजवाड येथील शेतकऱ्यांनीही पाच दिवसाचे धरणे आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. शिवाय या पाच दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास त्यानंतर मात्र, पुन्हा रास्तारोको केला जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यभर आता आंदोलनाची ठिणगी पडत असल्याने राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

पुणतांब्यात आज नेमके काय ?

नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनाला सुरवात झाली आहे. पाच दिवस धरणे आंदोलन आणि त्यानंतर शेतकरी आपली भूमिका मांडणार आहेत. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पध्दतीने राज्य सरकारचा निषेध केला जात आहे. गुरुवारी दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी ज्या शेतीमालाचे दर कवडीमोल आहेत त्याचे मोफत वाटप केले होते. आंदोलकांनी कांदा, कलिंगड आणि द्राक्षाचे वाटप केले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी नेमके काय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकरी आपल्या मागण्यावर ठाम असून राज्य सरकार काय निर्णय घेणार हे देखील तेवढेच महत्वाचे राहणार आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...