भाव वाढेल या आशेने मागच्या वर्षीचा कापूस अजून घरात, खरीपपुर्व हंगामाच्या पेरणीसाठी…

गेल्या वर्षाचा कापूस विक्रीला झाल्याने कर्ज काढून या वर्षाची लागवड करावी लागत असल्याचं शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षभरात कापसाचा भाव वाढला नाही. सात ते आठ हजारच्या पुढे कापूस न गेल्याने शेतकऱ्यांनी कापसाचा भाव वाढेल या आशेने कपाशी घरात ठेवली आहे.

भाव वाढेल या आशेने मागच्या वर्षीचा कापूस अजून घरात, खरीपपुर्व हंगामाच्या पेरणीसाठी...
मागच्या वर्षीचा कापूस अजून घरातImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 10:29 AM

धुळे : जिल्ह्यात कपाशीची लागवड सुरू झाली आहे .मात्र दुसरीकडे काही शेतकऱ्यांकडे अद्यापही गेल्या वर्षाचा कापूस घरातच पडून आहे. कपाशीला भाव (cotton rate) वाढत नसल्याने, भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला आहे. कापूस विकून लोकांची देणे दिले जाईल, या आशेने आणि भाव वाढेल या आशेने कापूस घरात ठेवला. मात्र भावाची वाढ न झाल्याने शेतकऱ्यांचा (dhule farmer news) कापूस अद्याप घरात आहे. यावेळी कपाशीची लागवडीला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षाचा कापूस विक्रीला झाल्याने कर्ज काढून या वर्षाची लागवड करावी लागत असल्याचं शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षभरात कापसाचा भाव वाढला नाही. सात ते आठ हजारच्या पुढे कापूस न गेल्याने शेतकऱ्यांनी कापसाचा भाव वाढेल या आशेने कपाशी घरात ठेवली आहे. यासाठी सरकारने पाऊले उचलायला हवी होती. शेतकऱ्यांचे (agricultural news) सरकार म्हणून सरकार गाजावाजा करत असलं, तरी शेताच्या कुठल्याही मालाला भाव नाही. अशी खंत नाना चौधरी यांनी सांगितली.

dhule farmer news

dhule farmer news

कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद

धुळे कृषी उत्पन्न समितीच्या भोंगळ कारभाराचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या महिन्याभरामध्ये ही बाजार समिती तीन वेळा म्हणजेच सुमारे आठ दिवस बंद ठेवण्यात आली होती. अचानक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवली जात असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पैश्यांची गरज असल्याने ते कांदा विक्रीसाठी अनंत आहेत. मात्र बाजार समिती बंद ठेवले जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. बाजार समितीत विक्री झालेला कांदा हा दुसरीकडे न्यायला वाहन भेटत नसल्याचा दावा व्यापाऱ्यांनी करत बाजार समिती बंद ठेवली आहे. व्यापाऱ्यांच्या या हाश्यास्पद कारणामुळे मात्र शेतकरी अडचणीत सापडला आहे. वारंवार बाजार समिती कांदा लिलाव बंद ठेवला जात असल्याने, ही बाजार समिती व्यापाऱ्यांच्या मनमानीसाठी आहे की शेतकऱ्यांच्या सुविधासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

आठ दिवसांतून एकदा नळाला पाणी, शेतकरी…

धुळे तालुक्यातील मोर शेवडी या गावात आता पाणीटंचाई भासू लागली आहे. गावात मोठ्या संख्येने पशुपालक आहेत, त्यांच्याकडे असलेल्या जनावरांसाठी आणि स्वतःच्या पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गरज भासत असते. मात्र गावात नळांना आठ दिवसात एकदा पाणी येतं ते पुरतं नाही. त्यामुळे गावकऱ्यांना आपल्या शेतीतून बैलगाडीद्वारे पाणी आणावे लागते. गावात असलेल्या नळांना सहा ते आठ दिवसानंतर पाणी येत असल्याने पाणीटंचाईचा सामना मोर शेवदी गावातील नागरिकांना करावा लागत आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणीटंचाई भासत असते. गावात मोठ्या संख्येने पशुपालक आहे, प्रत्येक घरी गाई म्हशी असल्याने पाण्याची आवश्यकता भासत असते. मात्र नळाला येणार पाणी पुरत नाही. त्यासाठी गावकऱ्यांना बैलगाडी द्वारे पाणी भरावे लागते. गावाबाहेर असलेल्या विहिरीवरून किंवा शेतकऱ्यांच्या शेतातून गावकरी हे बैलगाडी द्वारे पाणी भरतात. या ठिकाणी तरुण हे पहाटेच बैलगाडी काढून पाणी भरतात. त्यामुळे हे पाणीटंचाई दूर होण्यासाठी शासनाने पर्याय मार्ग सुचवावा अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.