संतापलेल्या शेतकऱ्याने पिकांवर फिरवला ट्रॅक्टर, कारण सांगताना…
मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी पिकावर ट्र्रॅक्टर फिरवत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात तर चार एकर शेतावर ट्रॅक्टर फिरवला आहे.
गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात एक घटना घडली आहे. त्यामध्ये एका शेतकऱ्याने (farmer) आपल्या चार एकर रानात ट्रॅक्टर फिरवला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या रानातली कपाशी लाल पडत असल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. मागच्या काही दिवसांपासून कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. वाढ थांबल्यामुळे पुढे फळ सुध्दा येत नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर (cotton crop destroyed) फिरवण्याचा निर्णय घेतला. काही शेतकऱ्यांनी जनावरं चरण्यासाठी त्यामध्ये सोडली आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी कपाशीचं पिक एकदम जोमात आलं होतं.
चार एकरातील कपाशी वर फिरविला ट्रॅक्टर
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या भंडारी येथील शेतकरी शैलेंद्र बिल्लारे या शेतकऱ्याने आपल्या साडेचार एकर शेतात लावलेल्या कपाशी पिकात ट्रॅक्टर घालून कपाशीचं पीक नष्ठ केलं आहे. खामगाव, नांदुरा, जळगाव, जामोदसह इतर तालुक्यात कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.
त्यामुळे त्याला आता फळे यायची बंद झाली आहेत. कपाशी या पिकावर लाखो रुपये करून काहीही हाती लागणार नसल्याने शेतकरी आता निराश झाला आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांनी कपाशी उपटून टाकली आहे. काहींनी ट्रॅक्टर किंवा जनावरे पिकात घातली आहे. खामगाव तालुक्यात येणाऱ्या भंडारी येथील शेतकरी शैलेंद्र बिलारे यांनी सुद्धा साडेचार एकरमध्ये कपाशीच्या पिकाची लागवड केली होती. त्याचबरोबर त्यावर लाखो रुपये त्यावर खर्च देखील केला होता. कपाशी जोमात असताना त्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे रागाच्याभरात त्यांनी पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.