पेरुची शेती करा अन् लाखो रुपये कमवा, एमबीए झालेल्या तरुणाच्या नव्या प्रयोगामुळं…
आता या पेरूच्या झाडाला वर्षातून दोनदा फलधारणा होत असून वर्षाकाठी साड़े ते चार लाख रुपयांचे उत्पन्न होत असल्याचे या तरुणाने सांगितलं आहे.
नांदेड : जिल्ह्यातील मुदखेड (nanded) तालुक्यातील कामळज (kamlaj) गावातील उच्चशिक्षित तरुणाने इस्त्रायल पद्धतीने सेंद्रिय पेरूची लागवड (Cultivation of guava) केली आहे. त्यातून तरुणाला आता एका एकर क्षेत्रातील पेरूच्या विक्रीतून वर्षाला चार लाखांचे उत्पन्न मिळत आहे. मुरलीधर खानसोळे या एमबीए (MBA Student)झालेल्या तरुणाने आपल्या एक एकर शेतात इस्त्रायल पद्धतीने व्हीएनआर जातीच्या पेरूची सातशे झाडे दहा बाय सात फूट अंतरावर लावली. त्यासाठी त्याने चार वर्षांपासून स्वतः सेंद्रीय खताची निर्मिती करत तेच खत झाडाला वापरले.
आता या पेरूच्या झाडाला वर्षातून दोनदा फलधारणा होत असून वर्षाकाठी साड़े ते चार लाख रुपयांचे उत्पन्न होत असल्याचे या तरुणाने सांगितलं आहे. विशेष म्हणजे या पेरूला जवळच्या तेलंगणा राज्यातील हैद्राबाद इथे मोठी मागणी आहे, त्यातून मोठे उत्पन्न होत असल्याचे मुरलीधर खानसोळे या उच्चशिक्षित युवकाने सांगितले आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांनी नवे अनेक प्रयोग केले आहेत. त्याचबरोबर त्यातून लाखो रुपयांचा फायदा करुन घेतला आहे. इतरांना सुद्धा त्याचपद्धतीने शेती करण्याचा सल्ला दिला आहे.
नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ भाग असलेल्या माहूर तालुक्यात गव्हाचे पीक जोमदारपणे बहरलय, यंदा थंडीची लाट महिनाभर राहिल्याने गव्हू काढणीसाठी काहीसा उशिराने तयार झालाय. मात्र पिकाच्या ओंब्या गव्हाच्या वजनाने लगडून गेल्या आहेत, त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा जास्त उत्पादन होईल असा अंदाज आहे. त्यातून माहूरसह शेजारच्या किनवट तालुक्यातील गव्हू उत्पादक शेतकरी चांगलेच सुखावले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील शेल्लाळी गावाच्या शिवारातील डोंगरावर वणवा पेटल्याने लाखोंची वनसंपदा जळून खाक झालीय, गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिल्यानंतर रात्री उशिरा या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलय. या डोंगरावर लागलेल्या आगीत अनेक वृक्ष जळून खाक झाली असून आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. वनविभागाचे अधिकारी ही आग कशामुळे लागली त्याचा शोध घेतायत, जागरूक नागरिकांनी आगीचे व्हीडिओ वनविभागाला पाठवल्याने तातडीने आग विझवता आलीय.