Wardha : कृषी विभागाचा दणका..! खरीप सुरु होण्यापूर्वीच कृषी सेवा केंद्रावर कारवाई, शेतकऱ्यांनो तुम्हीही सावध व्हा..!

ऐन खरिपाच्या तोंडावर कापूस बियाणे विक्रीला बंदी कशी असा सवाल तुम्हाला पडला असेल. पण शेतकरी अधिकच्या उत्पादनासाठी आणि वाढीव दरासाठी हंगाम सुरु होण्यापूर्वीच कापशीची लागवड करतात. त्यामुळे कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव हा इतर पिकांवरही होतो. किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ऐन हंगामातच कपाशीची लागवड करण्याचे आवाहन केले होते. एवढेच नाही तर 1 जून पासून कापूस बियाणे विक्रेत्यांना उपलब्ध करुन दिले गेले आहे.

Wardha : कृषी विभागाचा दणका..! खरीप सुरु होण्यापूर्वीच कृषी सेवा केंद्रावर कारवाई, शेतकऱ्यांनो तुम्हीही सावध व्हा..!
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 10:58 AM

वर्धा : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी (Agricultural Department) कृषी विभाग आणि सरकार तर प्रयत्न करीत आहेच पण त्याचबरोबर जमिनीचा पोत टिकवून रहावा यासाठीही काही पावले उचलली गेली आहेत. (Pre_Kharif Season) खरीपपूर्व हंगामात कपाशीचा पेरा झाला तर बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढतोच म्हणूनच यंदा (Cotton Seed) कापशीचे बियाणे हे 1 जूनपासूनच विकावे असे आदेश कृषी विभागाने दिले होते. असे असताना नियमांचे उल्लंघन करणे कृषी सेवा चालकांना चांगलेच महागात पडले आहे. एक जून पूर्वी कृषी केंद्र संचालकांनी कपाशीच्या बियाण्यांची विक्री करू नये असे आदेश असतांनाही बियाण्याची विक्री सुरु आहे. त्यामुळे भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी दोन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून सहा कृषी केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आले आहे.

म्हणून बियाणे विक्रीवर आहे बंदी

ऐन खरिपाच्या तोंडावर कापूस बियाणे विक्रीला बंदी कशी असा सवाल तुम्हाला पडला असेल. पण शेतकरी अधिकच्या उत्पादनासाठी आणि वाढीव दरासाठी हंगाम सुरु होण्यापूर्वीच कापशीची लागवड करतात. त्यामुळे कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव हा इतर पिकांवरही होतो. किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ऐन हंगामातच कपाशीची लागवड करण्याचे आवाहन केले होते. एवढेच नाही तर 1 जून पासून कापूस बियाणे विक्रेत्यांना उपलब्ध करुन दिले गेले आहे. असे असतानाही नियमांची पालन न करणाऱ्या कृषी सेवा चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

बियाणांची विक्री अन् कागदपत्रांमध्ये अनियमितता

मोहता मार्केट भागातील कोठारी कृषी सेवा केंद्रातून कापूस बियाण्यांची विक्री करण्यात आल्याचे पुढे आल्याने या कृषी केंद्रांचा बियाणे परवाना पुढील सहा महिन्यांकरिता निलंबित करण्यात आला आहे. तर चांडक ट्रेडर्स, वर्धा या कृषी केंद्रात कागदपत्रांची अनियमितता आढळून आल्याने या व्यावसायिक प्रतिष्ठानाचा बियाणे परवाना तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात आला आहे. त्यामुळे हंगामापूर्वीच कापसाच्या बियाणे विक्रीला परवानगी नसताना केलेली विक्री शेतकऱ्यांनाच चांगलीच महागात पडली आहे.

हे सुद्धा वाचा

कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

बियाणे विक्रीमध्ये अनियमितता आढळून आल्याने कृषी विभागाच्या भरारी पथकाने दोन कृषी सेवा केंद्राचा सहा महिन्यासाठी परवाना निलंबित केला आहे. एवढेच नव्हे तर सहा कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस देत दोन दिवसांत खुलासा सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली. धडक कृषी केंद्र तपासणी मोहीम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, कृषी विकास अधिकारी अभय चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत, संजय बमनोटे, मनोज नागपूरकर, परमेश्वर घायतिडक यांनी राबविली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.