Soybean Crop : बियाणांची उगवण क्षमता तपासा अन् मगच चाढ्यावर मूठ ठेवा, खरीप हंगामपूर्व बैठकांमध्ये कृषी विभागाचा सूर

रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून आता शेतकऱ्यांना आणि कृषी विभागाला वेध लागले आहेत ते खरिपाचे. गतवर्षी झालेल्या चूका टाळण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. दरवर्षी बियाणांची उगवण झाली नाही, उगवले पण बहरलेच नाही अशा तक्रारी कृषी विभागाकडे दाखल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीपूर्वीच त्याची उगवण क्षमता तपासणे गरजेचे आहे.

Soybean Crop : बियाणांची उगवण क्षमता तपासा अन् मगच चाढ्यावर मूठ ठेवा, खरीप हंगामपूर्व बैठकांमध्ये कृषी विभागाचा सूर
बियाणे
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 9:33 AM

हिंगोली: रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून आता शेतकऱ्यांना आणि (Agricultural Department) कृषी विभागाला वेध लागले आहेत ते (Kharif Season) खरिपाचे. गतवर्षी झालेल्या चूका टाळण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. दरवर्षी (Seeds) बियाणांची उगवण झाली नाही, उगवले पण बहरलेच नाही अशा तक्रारी कृषी विभागाकडे दाखल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीपूर्वीच त्याची उगवण क्षमता तपासणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यातील नुकसान तर टळणार आहेच पण दुबार पेरणीचे संकटही ओढावणार नाही.त्याच अनुशंगाने स्थानिक पातळीवर कृषी अधिकारी-कर्मचारी यांच्या बैठका पार पडत असून शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन केले जात आहे.

शेतकऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता याबाबतीत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना प्रात्याक्षिके दिले जाणार आहेत. यामध्ये पेरणीनंतर किती दिवसांमध्ये सोयाबीन उगवते शिवाय त्यानंतर उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी काय प्रयत्न करावेत याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. साठवणूक केलेल्या बियाणांच्या उगवण क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्यामुळे पेरणी करण्यापूर्वी 15 दिवस आगोदर या प्रयोग शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. शिवाय यंदा उन्हाळी हंगामात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. त्यामुळे अधिकतर शेतकरी हे घरच्या बियाणांवर भर देणार असून कृषी विभागाचे प्रशिक्षण महत्वाचे राहणार आहे.

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या

बियाणे खरेदी करताना योग्य ती काळजी घेतल्यास भविष्यात प्रश्न निर्माण होणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनी पक्की पावती घेऊन आणि परवानाधारक कृषीनिविष्ठा विक्री केंद्रावरुन कृषीनिविष्ठांची खरेदी करावी लागणार आहे. निविष्ठांची पावती, बियाणांच्या बॅगा, पाकिट टॅग, लेबल एवढेच नाही तर तणनाशक, कीटकनाशक व बुरशीनाशकांची पाकिटे, औषधाचे डबे हे खरीप हंगाम संपेपर्यंत शेतकऱ्यांना सांभाळून ठेवावे लागणार आहे. अधिकृत विक्रेत्याकडून कच्ची पावती किंवा विनापावती कृषीनिविष्ठांची खरेदी करु नये असा सल्ला कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे यांनी दिला आहे.

खरीप हंगामपुर्व बैठक

दरवर्षी खरिपाच्या अनुशांगाने जिल्हास्तरावर कृषी अधिकारी, महाबीजचे प्रतिनीधी, विक्रेत्ये यांची बैठक पार पडते. या बैठकीतच खरिपाचे नियोजन केले जाते. हिंगोली येथे जिल्हाधिकारी पापळकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली असून बियाणे, रासायिनक खत पुरवठा शिवाय पिकनिहाय अंदाजित क्षेत्राचा आढावा घेण्यात आला आहे. यावेळी कृषी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

Mahabaleshwar Rain : महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये गारांचा पाऊस! पर्यटकांची धांदल, स्ट्रॉबेरीलाही फटका

Agriculture College : वैज्ञानिकांनी कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आवाहन

Video: कोकणात गारांचा पाऊस! आजही तळकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह बरसण्याचा अंदाज

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.