कृषी विभागाचे वरातीमागून घोडे, डाळिंब बागाचे नुकसान अन् हंगाम संपल्यानंतर आता कीड नियंत्रणाचे धडे
सांगोला तालुक्याबरोबरच सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातही डाळिंब बागांचे क्षेत्र आहे. यंदाच्या हंगामात वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात 'पिन होल बोरर' अर्थात खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट तर झालीच पण अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब बागाच काढून टाकणे पसंत केले. यानंतर केंद्रीय पथक डाळिंब बागा पाहण्यासाठी सांगोला तालुक्यात दाखल झाले होते. शिवाय या पथकाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर चार दिवसांपूर्वीच सांगोला तालुक्यीतल महुद येथे शेतकरी परिषदेत डाळिंब बागाचे अस्तित्व कसे राहिल याअनुशंगाने मार्गदर्शन झाले होते.
सांगली : सांगोला तालुक्याबरोबरच (Sangli District) सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातही (Pomegranate orchard) डाळिंब बागांचे क्षेत्र आहे. यंदाच्या हंगामात वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात ‘पिन होल बोरर’ अर्थात खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट तर झालीच पण अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब बागाच काढून टाकणे पसंत केले. यानंतर (Central Team) केंद्रीय पथक डाळिंब बागा पाहण्यासाठी सांगोला तालुक्यात दाखल झाले होते. शिवाय या पथकाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर चार दिवसांपूर्वीच सांगोला तालुक्यीतल महुद येथे शेतकरी परिषदेत डाळिंब बागाचे अस्तित्व कसे राहिल याअनुशंगाने मार्गदर्शन झाले होते. एवढे सर्व झाल्यानंतर आता कृषी विभागाच्यावतीने खोड किडीसह मर रोगावर नियंत्रणाचे प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांना गरज असतानाच मार्गदर्शन झाले असते तर बागा जिवंत राहिल्या असत्या. आता 40 टक्के क्षेत्रावरील बागा काढून टाकल्यानंतर कृषी विभाग बांधार जाऊन उपाययोजना करीत आहे.
उशिराचे शहाणपण, अधिकारी थेट बांधावर
निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम यंदा फळबागांवर झालेला आहे. असे असताना योग्य वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन झाले असते तर पिन होल बोरर किंवा मर रोग हे नियंत्रणात आले असते. त्या दरम्यान कोणतेच मार्गदर्शन झाले नाही. आता मात्र, कृषी विभगाचे अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन रोगांपासून बागांचे संरक्षण व्हावे याकरिता रसायनाचे ड्रेचिंग, फवारणी आणि पेस्ट लावण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे उर्वरीत क्षेत्रावरील तरी बागांचे संवर्धन होईल असा विश्वास आहे.
केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर शेतकरी परिषदेचे आयोजन
सांगली, सांगोला या भागात डाळिंब उत्पादनात मोठी घट झाली आहे. येथील वातावरण डाळिंबासाठी पोषक असताना ही परस्थिती ओढावली कशी याचा अभ्यास करण्यासाठी महिनाभरापूर्वीच केंद्रीय पथक या भागात दाखल झाले होते. पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत वातावरणात बदल होत असताना योग्य काळजी न घेतल्यानेच ही परस्थिती ओढावल्याचे सांगितले होते. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी शेतकरी परिषदचेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेत डाळिंब संशोधन केंद्राचा ढिसाळ कारभार आणि कृषी विभागाची भूमिका यावर प्रश्न उपस्थित झाले होते.
शेतकऱ्यांना प्रात्याक्षिके
खोड किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डाळिंबाच्या खोडाला पेस्ट लावली जाते. जेणे करुन कीडीचा प्रादुर्भाव वाढणार नाही. कारण अजूनही या रोगावर ठोस असे औषधच नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना हेच महत्वाचे आहे.त्यामुळेच डाळिंब झाडाभोवती शिफारशीत कीटकनाशके, बुरशीनाशकांचे ड्रेचिंग, फवारणी व कीडनाशकांची पेस्ट कशी लावावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
Sangli : सांगलीवाडीच्या शिवारात बैलगाडा शर्यतीचा धुरळा, शर्यतीमध्ये ना काठी-ना लाठी
Gondia | गोंदियात Cycle Sunday Group ची अनोखी दिलदारी, पक्षांनाही मिळतेय थंडगार पाणी