Cotton Seed: कृषी सेवा चालकांची बंदीत ‘संधी’, वर्ध्यात कृषी विभागाच्या कोणत्या आदेशाची पायमल्ली?
नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर तसेच नियमित दरापेक्षा अधिकच्या दराने बी-बियाणे आणि खताची विक्री होत असेल तर त्यावर अंकूश असावा या दृष्टीकोनातून वर्धा जिल्ह्यामध्ये 9 भरारी पथकांची नेमणूक केली आहे. दरम्यान, खरीप हंगाम सुरु होताच खत, बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. टंचाईच्या नावाखाली अधिकच्या दराने बी-बियाणे आणि खताची विक्री केली जाते.
वर्धा : बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा (Pre-Season) हंगामपूर्व (Cotton Seed) कापूस बियाणे विक्रीवर कृषी विभागाने बंदी घातलेली आहे. 1 जूनपासूनच कापूस बियाणांची विक्री ही (Traders) कृषी सेवा चालकांना करता येणार असताना वर्धामध्ये मात्र, कृषी सेवा चालकांकडून या आदेशाची पायमल्ली करण्यात आली आहे. अगदी सहजरित्या कापूस बियाणे हे शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे कृषी विभागाचा उद्देश साध्य होणार का आणि नियम मोडलेल्या दुकानदारांवर काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे. बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय घेतला गेला पण कृषी सेवा केंद्राकडून मात्र याकडे दुर्लक्ष कऱण्यात आला आहे.
कापूस बियाणांबाबत वेळापत्रक का?
संपूर्ण राज्यात 2017 पासून गुलाबी बोन्ड अळीने गेल्या पाच वर्षात चांगलाच कहर केला आहेय..अनेक शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिसकावून गेल्याने प्रशासनाकडून गुलाबी बोन्ड अळीवर कृषी शास्त्रज्ञच्या माध्यमातून संशोधन करण्यात आले. जो शेतकरी मान्सूनपूर्व पेरणी करतो त्याच्या कपाशी वर गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येत आहेय. त्यामुळे राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने 1 जून पर्यंत कृषी केंद्राला बियाणे न विकण्याचे आदेश दिले आहेत.शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलेला आदेश कितपत कृषी विभागाचे चालक पाळतात हाच प्रश्न निर्माण झालाय.सध्या कृषी केंद्र चालक हे सध्या शेतकऱ्यांना कच्चा बिल देत असून एक जून नंतर पक्के बिल देणार असल्याच सांगत आहे.
9 भरारी पथकांची नेमणूक
नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर तसेच नियमित दरापेक्षा अधिकच्या दराने बी-बियाणे आणि खताची विक्री होत असेल तर त्यावर अंकूश असावा या दृष्टीकोनातून वर्धा जिल्ह्यामध्ये 9 भरारी पथकांची नेमणूक केली आहे. दरम्यान, खरीप हंगाम सुरु होताच खत, बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. टंचाईच्या नावाखाली अधिकच्या दराने बी-बियाणे आणि खताची विक्री केली जाते. वर्षानुवर्ष असे प्रकार घडले गेले आहेत म्हणून यंदा 9 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. असे असताना देखील जिल्ह्यात कापूस बियाणांची विक्री ही सुरुच आहे. त्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव हा कायम राहणार की काय असा सवाल उपस्थित झाला आहे. मात्र, कापूस बियाणे विक्री करत असल्याचे आढळल्यास सीड ऍक्ट,बियाणे नियंत्रण आदेश किंवा सीड रुल अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक अनिल इंगळे यांनी सांगितले आहे.
कापूस बियाणे विक्रीचे वेळापत्रक
हंगामाच्या अगोदरच बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकरी त्याची लागवड करतात. म्हणून बियाणे पुरविण्याचा एक कालावधी ठरविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बियाणांची उत्पादकता होते तेथून वितरकांपर्यंत 1 ते 10 मे दरम्यान बियाणे पुरविले जाणार आहे. तर वितरकांकडून 15 मे पासून किरकोळ विक्रत्यांना पुरविले जाणार आहे तर किरकोळ विक्रत्यांकडून शेतकऱ्यांना 1 जून नंतर विक्री केले जाणार आहे.