Agriculture News : शेतात पीक घेतलं, अधिक पैसे कमवण्यासाठी शेतकऱ्याने आयडिया केली, कमावले लाखो रुपये
शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांबरोबर त्याला योग्य तो पूरक व्यवसाय सुरू करावा आणि त्यातून आपली उन्नती साधावी यामुळे निश्चितच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
बुलढाणा : आजही अनेक शेतकरी (farmer) आपल्या शेतात पारंपरिक पीके (crop) घेतात. अतिवृष्टी किंवा कोरड्या दुष्काळामुळे त्याचे नुकसान झाल्यास हताश होतात. तर काही शेतकरी आत्महत्या सारखा मार्ग देखील स्विकारतात, परंतु शेतीला जोडधंदा केल्यास शेतकरी आपली आर्थिक उन्नती साधू शकतात, याचे उदाहरण उत्तम उदाहरण (buldhana khamgaon farmer) खामगाव तालुक्यातील एक शेतकरी आहे. पैसे कमवण्यासाठी आयडिया केली अन् ती कामी आली. भागवत भारसाकडे असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे. त्याचबरोबर चांगले पैसे कमावल्यामुळे त्याचं सगळीकडे कौतुक देखील होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील रोहना येथील भागवत भारसाकडे हे आपल्या शेतातील ऊस आधी व्यापाराला विकायचे. मात्र त्यामध्ये त्यांना फारसे उत्पन्न व्हायचे नाही, त्यामुळे त्यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी शेतीला जोड धंदा म्हणून आपल्याच शेतातील उसाच्या भरवशावर शेताजवळच रसवंती सुरू केली. ग्राहकांचाही त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय, आणि आज रोजी आपल्या एक एकर शेतातील ऊस आणि रसवंतीच्या व्यवसायावर ते पाच महिन्यात चार ते साडेचार लाख रुपये उत्पन्न घेत आहेत. रसवंती सुरू करण्यापूर्वी त्यांना एक एकर ऊसामध्ये केवळ एक लाख रुपये उत्पन्न व्हायचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांबरोबर त्याला योग्य तो पूरक व्यवसाय सुरू करावा आणि त्यातून आपली उन्नती साधावी यामुळे निश्चितच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
अनेक शेतकऱ्यांनी असाचं जुगाड करुन पैसे कमवायला हवे असं त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांना त्यातून अधिकचा आर्थिक मोबादला सुध्दा मिळेल असंही त्यांनी सांगितले.
राज्यभरातले शेतकरी आता आपली पारंपारीक शेती करीत असताना त्यातून आपल्याला अधिक पैसे कसे कमावता येतील याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे त्यासाठी वेगवेगळ्या गोंष्टीचा अभ्यास सुध्दा करीत असल्याचे अनेक प्रकरणातून उघडकीस आले आहे. अनेक शेतकरी युट्यूबवरती काही गोष्टी पाहून शेती करीत आहेत. त्याचबरोबर चांगली शेती करण्यात त्यांना देखील यश आले आहे.