Agriculture News : कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत कवडीमोल भावाने कलिंगडाची विक्री
बाजारपेठेचा विचार करून शेतकऱ्यांनी टरबूज खरबूजची लागवड केली होती. मात्र यावर्षी वाढलेले क्षेत्र आणि वाढलेली आवक यामुळे टरबूज खरबूजच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे.
जितेंद्र बैसाणे, नंदूरबार : कमी दिवसात येणारे आणि पैसा कमवून देणारे पीक म्हणून टरबूजच्या आणि खरबूजच्या (watermelon) पिकाकडे (crop) पाहिले जाते. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (farmer) मोठ्या प्रमाणात खरबुजाची लागवड केली होती. बाजारभाव नसल्याने उत्पादन खर्चही निघणार नसल्याची स्थिती नंदुरबार (nandurbar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांनी एका एकराला 80 हजार रुपये खर्च केला. परंतु खर्च केलेले पैसे सुध्दा मिळणार नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
खरबुजाला योग्य दरही मिळत नसल्याचे चित्र आहे
नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दोन हजार एकर पेक्षा अधिक क्षेत्रावर कलिंगड आणि खरबुजाची लागवड करण्यात आली आहे. रमजान महिन्यात टरबूज खरबुजाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्या हिशोबाने शेतकरी या पिकांची लागवड करत असतात. मात्र यावर्षी उत्पादन लवकर सुरू झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांना टरबूज आणि खरबुजाला योग्य दरही मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात शेतकरी कवडीमोल दरात या दोन्ही फळांची विक्री करतात. टरबूज आणि खरबूजचा एकरी खर्च जवळपास 80 हजार रुपयांचा आसपास आहे. मात्र दर नसल्याने ही शेतकरी अडचणीत सापडला असून रमजान अजून महिनाभर बाकी आहे. त्यामुळे शेतकरी आता टरबूज खरबूजची नवीन बाजारपेठ शोधत असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे अशी खंत जयराम गंगा मोरे यांनी व्यक्त केली.
बाजारपेठेचा विचार करून शेतकऱ्यांनी टरबूज खरबूजची लागवड केली होती. मात्र यावर्षी वाढलेले क्षेत्र आणि वाढलेली आवक यामुळे टरबूज खरबूजच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचं मोठ नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे.
पाडळपूर शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळला
तळोदा तालुक्यातील पाडळपूर रस्त्यावरील पुलाजवळ नाल्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. दरम्यान दोन बिबट्यांचे झुंजीत या बिबट्याचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. तळोदा तालुक्यातील रांझणी गावाजवळ पाडळपूर रस्त्यावरील पुलाजवळ नाल्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. सदर बिबट्याचे वय दीड वर्ष आहे. दरम्यान पाडळपूर रस्त्यावर पहाटेच्यावेळी बिबट्यांची झुंज होत असल्याचा आवाज येत होता असं ग्रामस्थांनी सांगितले आहे. बिबट्या प्रविण कदम यांच्या शेताजवळील नाल्यात मृतावस्थेत आढळुन आला. घटनेची माहिती वार्यासारखी पसरल्यानंतर ग्रामस्थांनी गर्दी केली. पशुधन विकास अधिकारी डॉ.विकास नवले यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर वनविभागाने बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.