पोल्ट्री ब्रीडर्सच्या भूमिकेवरुन रणकंदन, तर चिकन आयातीची परवानगी द्या : पाशा पटेल

पोल्ट्री ब्रीडर्सच्या या भूमिकेला सर्वच शेतकरी संघटनांचा विरोध होत आहे. आता केंद्र सरकारने सोयापेंड आयातीला परवानगी दिली तर आम्हालाही चिकन आयातीची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे.

पोल्ट्री ब्रीडर्सच्या भूमिकेवरुन रणकंदन, तर चिकन आयातीची परवानगी द्या : पाशा पटेल
पाशा पटेल संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 4:49 PM

लातूर : सोयाबीनचे वाढते दर पाहताच पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनच्यावतीने हे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी पशूसंवर्धन मंत्री यांना पत्र लिहले होते. मात्र, पोल्ट्री ब्रीडर्सच्या या भूमिकेला सर्वच शेतकरी संघटनांचा विरोध होत आहे. आता केंद्र सरकारने सोयापेंड आयातीला परवानगी दिली तर आम्हालाही चिकन आयातीची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे.

हंगामात मुहूर्ताचे दर वगळता सोयाबीनच्या दरात कायम घट झाली आहे. आता कुठे दिवाळीनंतर दर वाढत आहेत. दर वाढत असतानाच पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष बहादूर अली यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात सोयाबीनला प्रति क्विंटलला 2950 रुपये हमीभाव आहे. परंतु बाजारात सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपये दर मिळत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी सारखेच याही वर्षी पोल्ट्री उद्योगाचे नुकसान होणार आहे. सोयाबीनचे दर जास्ती जास्त चार हजार रुपये क्विंटल नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली होती.

सोयाबीनचे दर वाढले तर सोयापेंडचेही दर वाढणार

सध्या सोयाबीनच्या दरात तेजी आहे. मध्यंतरी सोयापेंडची आयात करण्यात आली होती त्या दरम्यान, सोयाबीनचे दर हे 4 हजार 500 वर स्थिर झाले होते. पण आता दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी सोयापेंडचेही दर वाढत असल्याने पोल्ट्री व्यवसाय हा अडचणीत येत आहे. त्यामुळे सोयबीनच्या दरावर केंद्र सरकारने नियंत्रण मिळवून सोयापेंडच्या आयातीची मागणी पोल्ट्री ब्रीडर्स यांनी केली आहे. त्यामुळे पोल्ट्र्री ब्रीडर्सच्या भूमिकेला शेतकरी संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे.

गतवर्षाीही सोयाबीन उत्पादक अडचणीत

अतिवृष्टीमुळे या वर्षी सोयाबीन उत्पादक अडचणीत आहे. आतापर्यंतही सोयाबीनला दर नव्हतेच दिवाळीनंतर दरात वाढ होऊ लागली आहे. तरीही त्या तुलनेत दर हे वाढलेले नाहीत. असे असताना पोल्ट्रीवाले सरकार दबाव आणून चार हजार रुपयापर्यंत सोयाबीनचा दर नियंत्रण करण्याचे कारस्थान करीत आहेत. गेल्या वर्षी देखील त्यांनी परदेशातून गेल्या वर्षी जीएम सोयापेंड आयात करून सोयाबीन उत्पादकांना अडचणीत आणले होते. आता तर सोयापेंडची आयात करण्यास परवानगी देण्यात आली तर आम्हालाही चिकन आयातीची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

ज्याच्यावर भिस्त ‘ते’ खरिपातील पिकही धोक्यात, शेतकऱ्यांनो अशी घ्या काळजी

कारखानदारांचा अजब दावा, म्हणे, शेतकऱ्यांच्या काळजीपोटीच विनापरवाना पेटवली कारखान्याची धुराडी

एकदा लागवड अन् वर्षभर कमाई, खरीप-रब्बी हंगामात घेता येणारे पिक

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.