Pune : हृदय पिळवटून टाकणारी घटना, 4 दिवसांमध्ये 30 जनावरांचा मृ्त्यू, पावसाने सर्वकाही हिरावले
यंदाचा पाऊस खरंच जीवावर बेतला आहे. खरिपातील पिकांचे तर नुकसान झाले आहेच पण आता जनावरांचीही यामधून सुटका नाही. चांदर हे गावं पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या वेशीवर घाटमाथ्यावर वसलेले आहे. त्यामुळे या भागात पावसाचं प्रमाण अधिक असतं.दोन आठवड्या पूर्वी चांदर जवळील डिगेवस्ती येथे अतिवृमूळे 15 जनावरांचा मृत्यू झाला होता.
पुणे : (Heavy Rain) पावसाच्या अवकृपेमुळे केवळ खरीप हंगामातील पिकांचे नुकसान एवढेच नाही तर शेतीचा जोडव्यवसायही अडचणीत आला आहे. वेल्हा तालुक्यातल्या घाटमाथ्यावर,24 जुलै ते 28 जुलै दरम्यान गार वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसानं, चांदर गावात जवळपास (The death of animals) 30 जनावरांनाचा मृत्यू झाल्याची घटना आहे. सततचा पावसाने निर्माण झालेला गारठा यामुळे जनावरांचा मृत्यू झाला तर काही जनावरे ही आजारी आहेत. (Pune District) चांदर हे गाव पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या वेशीवर आहे. शेती पिकांचे तर नुकसान झालेच पण आता ज्यावर उदरनिर्वाह होता ती दुभती जनावरेही निसर्गाने हिरावली आहेत. त्यामुळे जगावं कसे असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांसमोर आहे.
नेमकी कशामुळे घडली घटना?
गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या चांदर गावासह परिसरात पावसाची रिपरीप सुरु आहे. सततच्या पावसामुळे जनावरांना चरायला सोडा गोठ्याच्या बाहेरी निघणे मुश्किल झाले आहे. यातच गार वारा आणि जोरदार पाऊस यामुळे गारठून मृत्यू झाला आहे. यामध्ये मारुती सांगळे, कोंडिबा सांगळे, गणेश सांगळे, पांडुरंग सांगळे,सीताराम सांगळे,विठ्ठला पोळ, रामचंद्र सांगळे,वसंत सांगळे या शेतकऱ्यांच्या गाई, म्हैस, बैल, शेळी, मेंढी, कोंबड्या या सारख्या प्राण्यांचा समावेश आहे.
आठवड्याभरापूर्वीच 15 जनावरे दगावली
यंदाचा पाऊस खरंच जीवावर बेतला आहे. खरिपातील पिकांचे तर नुकसान झाले आहेच पण आता जनावरांचीही यामधून सुटका नाही. चांदर हे गावं पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या वेशीवर घाटमाथ्यावर वसलेले आहे. त्यामुळे या भागात पावसाचं प्रमाण अधिक असतं.दोन आठवड्या पूर्वी चांदर जवळील डिगेवस्ती येथे अतिवृमूळे 15 जनावरांचा मृत्यू झाला होता. तर आता 30 जनावरे दगावली आहेत.
शेतकऱ्यांना अपेक्षा मदतीची
एकीकडे पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. चांदर गाव हे घाटमाथ्यावर असल्याने डोंगराचा मोठा परिसर आहे. जनावरे चारण्यासाठी क्षेत्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भर दुग्ध व्यवसायावरच असतो. पण यंदा होत्याचं नव्हतं झाले आहे. केवळ महिन्यात 45 जनावरांचा मृत्यू केवळ पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गारठ्यामुळे झाला आहे. या गावात जाण्यासाठी साधा रस्ता देखील नाही. आता अशा परस्थितीमध्ये केवळ पंचनाम्यांची औपचारिकता न करता प्रत्यक्ष मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.