Maharashtra Dam : दिवसागणिस बदलत आहे धरणांचे चित्र, धरणातून विसर्ग अन् नदीला पाणी, कोणत्या धरणात किती साठा ? वाचा सविस्तर

गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 85 दरवाजे सुरू असून राज्यात सर्वात जास्त 26 लाख 85 हजार 390 क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणातून होत आहे. या पाण्यामुळे जिल्ह्यातील 20 ते 25 गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. सर्वाधिक फटका हा सिरोंचा तालुक्यातील गावांना बसलेला आहे. असे असताना जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस हा सुरुच आहे.

Maharashtra Dam : दिवसागणिस बदलत आहे धरणांचे चित्र, धरणातून विसर्ग अन् नदीला पाणी, कोणत्या धरणात किती साठा ? वाचा सविस्तर
अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे सर्व 13 ही दरवाजे उघडण्यात आले आहेत.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 11:27 AM

मुंबई : जून महिन्यातील प्रत्येक दिवस हा पावसाच्या प्रतिक्षेत गेलेला आहे. यंदाच्या हंगामात (Increase Water Level) पाणीसाठ्यात वाढ तर सोडाच पण खरिपाच्या रखडलेल्या पेरण्या तरी होणार की नाही अशी स्थिती होती. मात्र, जुलै महिना उजाडला आणि सर्वकाही बदलूनच गेले आहे. गेल्या 10 दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिल्याने आता दिवसागणिस (Dam Water) धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर वाढत्या पाणीपातळीमुळे धरणातून विसर्ग आणि नदीला पाणी असे चित्र सबंध (Maharashtra) राज्यात पाहवयास मिळत आहे. त्यामुळे पाणीपातळीत वाढ तर झाली आहे शिवाय भविष्यातील पिण्याचाही प्रश्न मार्गी लागत आहे. सध्या वाढत असलेल्या आवकमुळे अनेक धरणांचे दरवाजे हे खुले करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील धरणाची काय आहे स्थिती याचा घेतलेला आढावा

जळगावच्या हतनुर धरणाचे 36 दरवाजे उघडले

हंगामाच्या सुरवातीपासूनच जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचे सातत्य राहिलेले आहे. हतनुर धरणाचे शुक्रवारी 36 दरवाजे हे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे 54 हजार 562 क्युसेस प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तापी आणि पूर्णा नदी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे हातनुर धरणाच्या क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

मावळमधील पवना धरण पन्नाशीच्या वर

मावळात सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरण 55.25 टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 75 मीलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांमध्ये पाणीसाठ्यात 4.28 टक्के इतकी विक्रमी वाढ झाली आहे. मावळमध्ये 1 जूनपासून 1274 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. तर दिवसभरात 75 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पाणी साठ्यात अर्धशतक पूर्ण झाले असून धरणातील सध्याचा पाणीसाठा 55.25 टक्के झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 33.62 टक्के इतका होता

हे सुद्धा वाचा

गंगाखेडमधील मासोळी प्रकल्प ओव्हरफ्लो, येलदरीमध्ये 61 टक्के पाणी

परभणीत सतत एक आठवडा झालेल्या पावसाने परभणी जिल्ह्यातील छोट्या मोठ्या प्रकल्पात जलसाठा चांगलाच वाढला आहे. गंगाखेड तालुक्यातील महत्त्वाचा असलेला मासोळी प्रकल्प शंभर टक्के भरला असून सांडव्यातून पाणी सोडण्यात आले आहे . तर जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या येलदरी धरणाच्या पाणीसाठ्याची भरमसाठ वाढ झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच येलदरी धरणात असलेल्या जिवंत पाणी साठ्याची टक्केवारी 61 टक्के पेक्षा अधिक झाली आहे .

विष्णुपुरी धरणातील 2 दरवाज्यातून विसर्ग

नांदेडसह आजूबाजूच्या जिल्ह्यात पावसाने उसंत दिल्याने पूरस्थिती ओसरण्यास सुरुवात झाली आहे. गोदावरी नदीच्या पाण्यात आवक कमी झाल्याने उघडलेल्या सात दरवाज्यापैकी पाच दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आता विष्णुपुरी बंधाऱ्यांचे केवळ दोनच दरवाजे उघडे असून त्यातून 20 हजार 52 क्यूसेक्स वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग आहे. गोदावरीचे पाणी कमी झाल्याने पाण्याचा फुगवटा कमी झाला असून तुंबलेले ओढे नाले पुन्हा प्रवाहित झालेयत. त्यामुळे शेत शिवारात साचलेले पाणी कमी होण्यास सुरुवात झालीय.

भंडारदरा धरण 65% नगर जिल्ह्यातील पाणीप्रश्न मिटला

अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले भंडारदरा धरण 65 टक्के , निळवंडे धरण जवळपास 70 टक्के तर मुळा धरण 50 टक्के भरले आहे.अकरा टिएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक धरणात सुरू आहे. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील नागरीकांच्या पिण्याचं पाणी आणि शेती या धरणावर अवलंबून आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट पर्यंत भंडारदरा धरण भरत असते. यंदा मात्र पावसाचा जोर असाच कायम राहीला तर लवकरच हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

मेडीगट्टा लक्ष्मी धरणात आवक सुरुच

गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 85 दरवाजे सुरू असून राज्यात सर्वात जास्त 26 लाख 85 हजार 390 क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणातून होत आहे. या पाण्यामुळे जिल्ह्यातील 20 ते 25 गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. सर्वाधिक फटका हा सिरोंचा तालुक्यातील गावांना बसलेला आहे. असे असताना जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस हा सुरुच आहे.

पंचगंगा नदीची पाणीपातळी 37 फुटांवर

कोल्हापूर शहरासह धरण क्षेत्रात पावसाची उघडीप असली तरी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ मात्र कायम आहे. नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने होतेय वाढ होत आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी 37 फूट आठ इंचावर पोहोचली आहे.

अप्पर वर्धा धरणाचे सर्व 13 ही दरवाजे उघडले

पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे सर्वच्या सर्व 13 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाच्या 13 हि दरवाजाच्यातुन आता 1392 क्यूसेक विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडन्यात आला. तर धरण हे 80 टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने मध्यरात्री उघडले सर्व 13 दरवाजे खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या चारही जिल्ह्यातील नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.