ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचं योजनेद्वारे निराधार महिला शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू बनले आधारवड

ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचं योजनेतून आतापर्यंत सुमारे 100 एकर पेक्षा जास्त शेतीची कामे करून देण्यात आली आहेत.

ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचं योजनेद्वारे निराधार महिला शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू बनले आधारवड
बच्चू कडू, राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 6:35 PM

अमरावती: अचलपूर विधानसभा मतदार संघातील निराधार,विधवा,परीतक्त्या आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिलांच्या पाठिशी राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू उभे ठाकले आहेत. ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे ही योजना राबवली जात आहे. ही योजना अचलपूर मतदार संघात सुरू झाली आहे. (Bacchu Kadu started welfare scheme for women farmers of Achalpur)

अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त योजनेची आखणी

पतीच्या निधनानंतर कुटूंबाचा चरितार्थ चालविण्याची वेळ या महिलांवर येते. नांगरणी, वखरणी, पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून अशा विवंचनेत या महिला भगिनी असतात. नेमकी ही बाब राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या लक्षात येताच अहिल्या देवी होळकर यांच्या जयंती दिनी ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे ही योजना आखाण्यात आली. या योजनेचा तालुक्यातील महिलांना लाभ झाला आहे.

बच्चू कडूंच्या मातोश्रींच्या वाढदिवशी शुभारंभ

राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराआई कडू यांच्या वाढदिवशी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेची नोंदणी अचलपूर विधानसभा मतदारसंघात सुरू झाली होती व अजुनही सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 100 एकर पेक्षा जास्त शेतीची कामे या योजनेतून करून देण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी मतदारसंघातील ही कामे पूर्ण करून त्या महिला व त्यांच्या कुटूंबियांसाठी एक आधारवडाची भूमिका राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू बजावित आहेत.

सोलापूरमध्येही अशाच प्रकारचा उपक्रम

सोलापूरच्या माढा तालुक्यातील वडशिंगे गावातील तरूण शेतकरी मुन्ना साठे यांनी यासाठी मोफत ट्रॅक्टर व शेती अवजारे गावातील शेतकर्यांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. शेतीमालाला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अशातच वाढत्या इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी आणखी अडचणीत आले आहेत.गरीब व अल्पभूधारक शेतकर्यांच्या शेतीची मोफत मशागत करून देण्यासाठी मुन्ना साठे या तरूण शेतकऱ्यानं ट्रॅक्टरसह मशागतीसाठी लागणारी अवजारे उपलब्ध करुन दिली आहेत. शेतकऱ्यांना यामध्ये फक्त डिझेल घालावे लागणार आहे, असं मुन्ना साठे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

डिझेल टाका, शेतीची मशागत करा, सोलापूरच्या तरुणाची अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनोखी ट्रॅक्टर सेवा

(Bacchu Kadu started welfare scheme for women farmers of Achalpur)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.