Osmanabad: कर्जवसुलासाठी DCC बॅंकेचा अनोखा फंडा, कर्मचाऱ्यांचे कर्जदारांच्या घरासमोर बैठा सत्याग्रह
कर्ज वसुली होत नसल्यामुळे थकबाकीचा आकडा हा वाढत आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बॅंका ह्या डबघाईला आलेल्या आहेत. एवढेच नाही तर या बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या पगारी देखील झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे, बॅंकेची साखर कारखाने, बिगरशेती सहकारी संस्था, मजूर संस्था, प्रक्रिया संस्था एवढेच नाही तर पगारदार संस्थांकडेही थकबाकीचा आकडा हा वाढत आहे.
उस्मानाबाद : वाढती (Bank Loan) कर्ज प्रकरणे आणि वसुलीबाबत ग्राहकांची उदासिनता यामुळे थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील अर्थकराणाचा मूळ स्त्रोत असलेली (DCC) जिल्हा मध्यवर्ती बॅंक डबघाईला येत आहेत. एवढेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून बॅंक (Bank Employee) कर्मचाऱ्यांच्या पगारीही झालेल्या नाहीत. त्यामुळे आता बॅंक कर्मचाऱ्यांनीच वसुली मोहीम तेही अनोख्या पध्दतीने राबवण्याचा निर्धार केला असून शनिवारपासून बॅंकेचे कर्मचारी हे कर्जदारांच्या घरासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. कर्मचाऱ्यांची 27 पथके जिल्ह्यात विविध ठिकाणी कर्जदारांच्या घऱासमोर बसणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा हा फंडा तरी उपयोगी पडणार का नाही हे पहावे लागणार आहे.
संस्थांकडेच थकबाकीचा आकडा
कर्ज वसुली होत नसल्यामुळे थकबाकीचा आकडा हा वाढत आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बॅंका ह्या डबघाईला आलेल्या आहेत. एवढेच नाही तर या बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या पगारी देखील झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे, बॅंकेची साखर कारखाने, बिगरशेती सहकारी संस्था, मजूर संस्था, प्रक्रिया संस्था एवढेच नाही तर पगारदार संस्थांकडेही थकबाकीचा आकडा हा वाढत आहे.वाढत्या थकबाकीमुळे बॅंकेकडूल रोख रक्कम ही पूर्णत: संपलेली आहे. बॅंकेचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे थकबाकी असलेल्या संस्थाकडील वसुलीसाठी कर्मचारी हे आता थकबाकीदारांच्या दरात वसुलीसाठी बसणार आहेत.
कर्मचारी वेतनाविना
वाढत्या थकबाकीमुळे या बॅंकेतील कर्मचारी हे वेतनाविना आहेत. गेल्या 10 ते 12 महिन्यापासून ही अवस्था आहे. त्यामुळे कर्माचाऱ्यांचे जगणेही मुश्किल झाले आहे. वसुलीसाठी एक ना अनेक योजना राबवण्यात आल्या मात्र, त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. कर्ज वसुलीसाठी सहमती धोरणांचा अवलंब करुन कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न झाला मात्र, त्याचेही पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न हा मार्गी लागेलाच नाही.
राजकीय हस्तक्षेपाचा अडसर
थकीत रक्कम वसुल करण्याासाठी यापूर्वी बॅंकेने असे विविध उपक्रम हाती घेतले होते. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा कारभार हा राजकीय दबावातच सुरु आहे. त्यामुळे वसुलीसाठी एक ना अनेक उपक्रम हाती घेण्यात आले परंतू राबवण्यापूर्वीच असे उपक्रम गुंडाळून ठेवले जातात. आताही 27 ग्रुप या वसुलीसाठी राबवण्यात आले आहेत. शनिवारपासून या वसुली मोहीमेला सुरवात होत असून आता प्रतिसाद कसा मिळतोय हे पहावे लागणार आहे.