उचलली रिस्क, प्रॉफिट फिक्स! बीडमध्ये शतावरीचं पीक घेऊन तब्बल 10 लाखांचं उत्पन्न!

बीडमधील केज तालुक्यातील धनराज भुसारे यांनी एक एकर शेतात शतावरीचं पीक घेतलं. शतावरीचा ही औषधी वनस्पती आहे. shatavari farming Beed

उचलली रिस्क, प्रॉफिट फिक्स! बीडमध्ये शतावरीचं पीक घेऊन तब्बल 10 लाखांचं उत्पन्न!
Follow us
| Updated on: Jul 04, 2020 | 7:18 PM

बीड : पारंपरिक शेतीला फाटा देत दुष्काळी भागातील शेतकरी आता शेतामध्ये नवनवे प्रयोग करत आहेत. बीडमध्ये एका प्रयोगशील शेतकऱ्याने कापूस, सोयाबीन या नेहमीच्या पिकांऐवजी शतावरीचं पीक घेतलं. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर या शेतकऱ्याने केवळ 18 महिन्यात तब्बल 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ हे दुष्टचक्र केजच्या धनराज भुसारे या पठ्ठ्याने भेदलं. (shatavari farming Beed)

केज तालुक्यातील धनराज भुसारे यांनी एक एकर शेतात शतावरीचं पीक घेतलं. शतावरीचा ही औषधी वनस्पती आहे. शतावरीची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे यातून चांगलं उत्पन्न मिळतं, याबाबतची माहिती धनराज भुसारे यांना मिळाली. त्यांनी एका खासगी कंपनीशी करार करुन शतावरीची लागवड केली. आठरा महिन्यानंतर आता त्यांचं पीक काढणीला आलं आहे. जेसीबीच्या सहाय्याने शतावरीच्या मुळा काढल्या जातात. शतावरी पिकातून त्यांना अठरा महिन्यात तब्बल दहा लाख रुपयांचं उत्पन्न हाती आलं आहे. (shatavari farming Beed)

पुण्यातील समर्थ अॅग्रो कंपनीने भुसारे यांना शतावरीचे पीक घेण्यासाठी प्रेरित केलं. भुसारे पारंपरिक शेती करत होते. मात्र अशातच त्यांनी शतावरी लागवडीची माहिती घेऊन, नियोजन केलं. अठरा महिन्यानंतर याचं पीक पूर्ण झालं असून अॅग्रो कंपनीने शतावरीचा हा एक एकराचा फड खरेदी केला.

बीड जिल्ह्यामध्ये परंपरागत शेती करणारे अनेक शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकले आहेत. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र धनराज भुसारे यासारख्या पठ्ठ्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड देऊन, हे दुष्टचक्र भेदलं. शतावरीसारखं पीक कृषी विभागाकडून लावण्याची परवानगी आणि त्यासाठी मार्गदर्शन जर मिळालं, तर याचा नक्कीच फायदा जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना होईल आणि शेतकऱ्यांची आर्थिक बाजू बळकट होईल. यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

मराठवाड्यातील शेतकरी आज अनेक अडचणींना सामोरे जात आहे. मात्र शेतकऱ्यांनी योग्य माहिती, योग्य नियोजन करुन प्रगत शेतीची कास धरली तर नक्कीच त्यांना फायदा होतो, हे धनराज भुसारे यांनी दाखवून दिलं आहे.

shatavari farming Beed

संबंधित बातम्या 

राज्यातील सव्वाअकरा लाख शेतकऱ्यांना जुलैअखेरपर्यंत कर्जमाफी, सहकार मंत्र्यांची मोठी घोषणा 

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.