Beed : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जोडले हात, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला काय मिळणार मदत?

शासन स्तरावरुन जे मदतीचे निकष आहेत ते पूर्ण केले जाणार आहेत. त्यामुळे नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना त्वरीत मदत देण्याच्या अनुशंगाने गेवराईचे तहसील हे त्यांच्या कुटुंबियांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणार आहेत. त्यानंतर मदतीच्या अनुशंगाने जी काही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. घरचा कर्ता पुरुष गेल्यावर काय स्थिती होते याची जाणीव आम्हालाही आहे.

Beed : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जोडले हात, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला काय मिळणार मदत?
बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 10:14 AM

बीड: जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतकरी हा (Surplus Sugarcane) अतिरिक्त ऊस उत्पादनाचा बळी ठरला आहे. उसाची तोड होत नसल्याने नामदेव आसाराम जाधव या 32 वर्षीय शेतकऱ्याने (Farmer Suicide) गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर मात्र, प्रशासन हे खडबडून जागे झाले आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे आता (Beed District) प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना हात जोडून विनंती केली आहे की, प्रश्न गंभीर असला तरी शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. यावर लवकरच तोडगा काढला जाईल पण आत्महत्या हा काही त्यावरचा पर्याय नाही. अतिरिक्त ऊसाला घेऊन जाधव यांनी जे टोकाचे पाऊल उचलले आहे त्यानंतर जिल्ह्यात सर्व यंत्रणा ही कामाला लागली आहे तर दुसरीकडे नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना मदत देण्याच्या अनुशंगाने प्रयत्न सुरु झाले आहेत.

नेमकी काय होणार मदत?

शासन स्तरावरुन जे मदतीचे निकष आहेत ते पूर्ण केले जाणार आहेत. त्यामुळे नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना त्वरीत मदत देण्याच्या अनुशंगाने गेवराईचे तहसील हे त्यांच्या कुटुंबियांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणार आहेत. त्यानंतर मदतीच्या अनुशंगाने जी काही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. घरचा कर्ता पुरुष गेल्यावर काय स्थिती होते याची जाणीव आम्हालाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा राहणार असल्याचे जिल्हाधिकारी विनोद शर्मा यांनी सांगितले आहे.

ऊस पेटवून घेतला होता गळफास

राज्यात आणि त्यामध्येच मराठवाड्यात अतिरिक्त उसाचे प्रश्न हा कायम आहे. कालावधी पूर्ण होऊन देखील तोड होत नसल्याने असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. डोळ्यादेखत ऊसाचे होत असलेले नुकसान न सहन झाल्याने हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांनी ऊस पेटवून गळफास घेतला. फडाला लागूनच असलेल्या एका झाडाला त्यांनी गळफास घेतला होता.

हे सुद्धा वाचा

अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम

जिल्ह्यात 85 हजार हेक्‍टरवर उसाची लागवड झाली असून 55 लाख टन उत्पादन होणार आहे. तर पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपावीना शेतात पडून आहे. जेवढं शक्य होईल तेवढी लवकरच तोडणी केला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न हा गंभीर होता, प्रशासनाने मात्र वेळीच याकडे लक्ष दिलं असतं तर मात्र जाधव यांच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.