Central Government : ‘पीएम किसान’ चे लाभार्थी आहात मग चिंता सोडा, ‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेचाही घेता येणार लाभ

सध्या देशभरात किसान क्रेडीट कार्डमध्ये शेतकऱ्यांचा सहाभाग हा वाढवून घेतला जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी उपक्रम राबवले जात असून क्रेडिट कार्ड योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करून संबंधित बँक शाखांमध्ये पाठविण्यात येत आहे. त्यानुसार गावामध्ये विशेष ग्राम सभेचे आयोजन करुन शेतकऱ्यांचा सहभाग वाढविला जाणार आहे.

Central Government : 'पीएम किसान' चे लाभार्थी आहात मग चिंता सोडा, 'किसान क्रेडिट कार्ड' योजनेचाही घेता येणार लाभ
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 12:40 PM

मुंबई :  (PM Kisan Scheme) पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देशभरातील 10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांना (Central Government) केंद्राच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या आर्थिक रकमेचा उपयोग शेती कामांसाठी तर होत आहेच पण आता या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असताल तर तुम्हाला आता (Kisan Credit Card) किसान क्रेडीट कार्डची देखील सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना विविध योजना ह्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत. त्याच अनुशंगाने आता हा निर्णय घेण्यात आला आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवरच आता शेतकऱ्यांना किसान क्रेड़ीट कार्डचा फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची संख्याही वाढणार असून एकाच ठिकाणी दोन योजनेत सहभागी होता येणार आहे.

किसान क्रेडीट कार्ड उपक्रमाला मिळणार गती

सध्या देशभरात किसान क्रेडीट कार्डमध्ये शेतकऱ्यांचा सहाभाग हा वाढवून घेतला जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी उपक्रम राबवले जात असून क्रेडिट कार्ड योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करून संबंधित बँक शाखांमध्ये पाठविण्यात येत आहे. त्यानुसार गावामध्ये विशेष ग्राम सभेचे आयोजन करुन शेतकऱ्यांचा सहभाग वाढविला जाणार आहे. तर दुसरीकडे जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत पण त्यांच्याकडे किसान कार्ड नसेल तर अशा शेतकऱ्यांनी संबंधित बॅंकेशी संपर्क करुन किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करु शकरणार आहेत. याकरिता शेतकऱ्यांना घोषणापत्रही द्यावे लागणार आहेत.

तरच मिळणार 12 हप्ता..!

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळतात. असे असले तरी शासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालनच केले जात नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यापासून याकरिता पाठपूरावा केला जात असला तरी दुर्लक्ष केले जात आहे. पण आता पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण कण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती पण 31 जुलै ही शेवटची मुदत असून यापूर्वीच ई-केवायसी पूर्ण करावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

अपात्र शेतकऱ्यांवर निर्बंध लादण्यासाठी ई-केवायसी

केंद्र सरकारच्या या महत्वपूर्ण योजनेचा लाभ हा केवळ गरजू आणि अल्पभुधारक शेतकऱ्यांना मिळावा हा आहे. असे असले तरी जे या योजनेसाठी पात्र नाहीत अशा लाखो शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे हे अपात्र शेतकरी वगळण्यासाठी ई-केवायसी करुन घेतले जात आहे. देशात कोट्यावधी नागरिक असे आहेत ते पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेत आहेत. यावर अंकूश आणला जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.