शेतकऱ्यांनी धरली सेंद्रीय शेतीची कास, विषमुक्त शेतीसाठी उभारलेली जैविक प्रयोगशाळा कशी आहे?

शेतकऱ्यांचा कल विषमुक्त शेतीकडे वाढण्यास चालना मिळणार आहे. शेतीत विविध पिकांचे उत्पादन घेत असताना कराव्या लागणाऱ्या अवाढव्य उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे.

शेतकऱ्यांनी धरली सेंद्रीय शेतीची कास, विषमुक्त शेतीसाठी उभारलेली जैविक प्रयोगशाळा कशी आहे?
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 3:01 PM

वाशिम : वाढत्या रसायनाचा शेतीवर आणि पर्यायाने मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो. रासायनिक शेतीला बगल देणे गरजेचे झाले आहे. सेंद्रीय शेतीकडे वळणे ही आता काळाची गरज झाली आहे. नेमकी हीच बाब ओळखून वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथील शेतकऱ्याने पुढाकार घेतला. शेतकरी भागवत ढोबळे यांनी शेत बांधावर जैविक प्रयोगशाळा उभारली. गावाबरोबरच परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळविण्याची किमया साधली आहे. डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोला अंतर्गत स्थापित योगायोग जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी आणि मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत शेत बांधावरील प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. या नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत सुरू केलेल्या या प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावतचं जैविक निविष्ठा उपलब्ध होत आहेत.

बांधावरील प्रयोगशाळा

कृषी क्षेत्रातील या अभिनव प्रयोगामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल विषमुक्त शेतीकडे वाढण्यास चालना मिळणार आहे. शेतीत विविध पिकांचे उत्पादन घेत असताना कराव्या लागणाऱ्या अवाढव्य उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. शेतकऱ्यांचे अर्थचक्र सुधारून कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त नफा त्यांना व्हावा, याकरिता वाशिम जिल्ह्यात फार्म लॅब अर्थात बांधावरील प्रयोगशाळा ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

वाशिम जिल्ह्यात २० प्रयोगशाळा

या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अत्यल्प खर्चात जैविक निविष्ठांची निर्मिती करण्यात येत आहे. प्रशिक्षित शेतकऱ्यांकडून संचालित होत असलेल्या २० प्रयोगशाळा जिल्ह्यात कार्यरत आहेत. यामधून निर्माण होत असलेल्या निविष्ठांचा उपयोग शेतकरी करत आहेत.

दिवसेंदिवस वाढत्या उत्पादन खर्चाने शेतकरी मेटाकुटीस आलेत. रासायनिक खते आणि कीटकनाशकाच्या सततच्या वापराचे प्रतिकूल परिणाम शेतजमिनीच्या आरोग्यावर होत आहेत. या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून फार्म लॅब अर्थात शेतीच्या बांधावरील प्रयोगशाळा ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे.

या जैविक निविष्ठांची निर्मिती

कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात सर्वप्रथम प्रयोगशील शेतकऱ्यांच्या गटांना प्रशिक्षित करण्यात आले आहेत. याच तज्ज्ञ संचालकांच्यामार्फत या प्रयोगशाळांचे कामकाज चालविण्यात येत आहे.

या प्रयोगशाळांच्या माध्यमातून विविध जिवाणू खते, जैविक किटकनाशके, ट्रायकोडर्मा, बियाण्यास बीज प्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त असलेले रायझोबियम यासारख्या निविष्ठांची निर्मित करण्यात येते.

घरगुती पध्दतीने तयार होणाऱ्या या दर्जेदार निविष्ठांचा खर्च बाजारात मिळणाऱ्या निविष्ठांच्या तुलनेत फारच कमी आहे. या जैविक निविष्ठांच्या वापरामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होण्यास मदत होत आहे. या अभिनव प्रयोगामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढीस हातभार लागला आहे.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.