Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आघाडीच्या काळात अन्नदात्यावरही अन्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींचे साखळी उपोषण

सबंध राज्यात सध्या कृषीपंपाच्या वाढत्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्याची प्रक्रियाच सुरु करण्यात आली आहे. पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत निसर्गाच्या अवकृपेमुळे पीक पदरात पडले नाही तर आता सरकारच्या या भूमिकेमुळे नुकसान होत आहे.

आघाडीच्या काळात अन्नदात्यावरही अन्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींचे साखळी उपोषण
विद्युत पुरठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले आहे.
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 2:15 PM

वर्धा : सबंध राज्यात सध्या (Agricultural Pump) कृषीपंपाच्या वाढत्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्याची प्रक्रियाच सुरु करण्यात आली आहे. पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच शेतकऱ्यांचा (Power supply interrupted) विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय (State Government) सरकारने घेतला आहे. आतापर्यंत निसर्गाच्या अवकृपेमुळे पीक पदरात पडले नाही तर आता सरकारच्या या भूमिकेमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदार संघात जी कारवाई आहे ती थांबवण्यात यावी या मागणीसाठी आ. समीर कुणावर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. विशेष म्हणजे या उपोषणामध्ये हिंगणघाट मतदार संघातील 40 गावच्या सरपंचांनीही सहभाग नोंदवलेला आहे. उपोषणातून वर्ध्याला मिळणार असलेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईचे 178 कोटी आघाडी सरकारने थकवीले असल्याचा आरोप कुणावार यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे अन्न खायचे आणि त्यांचे वीज कनेक्शन कापायचे हा आघाडी सरकारचा दुटप्पीपणा असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

काय आहेत मागण्या ?

या साखळी उपोषणात शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करून द्यावी, वीज कनेक्शन कापणे थांबवावे, यापूर्वी 2020-21 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेले पिकाची नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची 178 कोटी रुपयांची थकलेली रक्कम लवकरात लवकर वर्धा जिल्ह्याला द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असून या आंदोलनात भाजपचे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगराध्यक्ष देखील सहभागी झाले हाते.

रब्बी हंगामातील पिकांचे नुकासान

वातावरण निवाळल्याने रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. शिवाय गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये वाढ होत असल्यााने पिकांना पाणी देणेही गरजेचे झाले आहे. असे असतानाच वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारीच आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या हीतासाठी सरकार कटीबध्द असल्याचे सांगितले जात असून दुसरीकडे असा अन्याय करुन हे सरकार दुटप्पीपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप या उपोषणादरम्यान आ. समीर कुणावर यांनी केला आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खरी जाण ही सरपंचांनाच असल्याने या साखळी उपोषणात परिसरातील 40 गावचे सरपंच सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या :

घोषणाच नाही तर अंमलबजावणीही, लातूर जिल्हा बॅंकेचा एक निर्णय अन् शेतीचा कायापालट, वाचा सविस्तर..!

ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्य तपासणीचा ‘इंदापूर पॅटर्न’ ; 5 हजार मजुरांची तपासणी

शेतकऱ्याचा नाद खुळा : वऱ्हाड थेट बैलगाडीतून लग्नस्थळी, नेमकं काय कारण?

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.