Yavatmal : या जिल्ह्यात बोगस खत साठा सापडला, ट्रकसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

bogus seeds : महाराष्ट्रात काही जिल्ह्यात बोगस बियाणे, खते याची विक्री जोरात सुरु आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून पोलिसांनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कारवाई केली आहे.

Yavatmal : या जिल्ह्यात बोगस खत साठा सापडला, ट्रकसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
yavatmal agricultural departmentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 9:42 AM

यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात एका ठिकाणी कृषी विभागाने (agricultural department) पोलिसांच्या मदतीने बोगस खत साठ्यावर कारवाई केली. त्यामध्ये ट्रकसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जैव उत्प्रेरक नावाचे बोगस खतं सापडले असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. 17 लाख 84 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल ट्रकमध्ये मिळाला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पंचायत समिती कृषी विभागाने तालुक्यातील नाका पार्डी (naka pardi grampanchayat) येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर केली आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत किती जणांना बनावट खतं विकले आहे, यांची किती जणांची टोळी आहे. या सगळ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

ट्रक चालक हरिष मनु कोकण, वाहक हेमंत धनराज मराठे या दोघांना कारवाई दरम्यान ताब्यात घेतले आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात बोगस बियाणे आणि खतं विक्री सुरु आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला या प्रकरणाबाबत माहिती मिळाली होती. त्यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामपंचायत नाकापाडी येथील कार्यालयासामोर ट्रक उभा होता.

उभ्या असलेल्या ट्रकमध्ये जैव उत्प्रेरक नावाचे बोगस खतं होते. बोगस खतांची निर्मिती करुन शेतकऱ्यांना लुटण्याचे काम काहीजण करत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

कृषी अधिकारी प्रमोद लव्हाळे यांनी बोगस खतं असल्याची माहिती मिळाली, त्यांनी पोलिसांच्या मदतीने तिथं धाड टाकली. त्यावेळी तिथं एक महिला आणि काही लोकं खतांची विक्री करताना आढळून आले. तिथल्या लोकांना पोलिस आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पळ काढला. पोलिसांनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी 17 लाख 84 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ताब्यात घेतलेल्या लोकांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर घटनास्थळावरुन फरार झालेल्या व्यक्तींचा पोलिस शोध घेत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.