बुलढाणा नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, रब्बी पिकाला फटका बसणार, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत

5 मार्च ते 7 मार्च दरम्यान जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. या अवकाळी पावसाने आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकांतील काढणीला आलेल्या गहु, हरबरा, मका, तसेच आंबा, फळे व पालेभाज्यांना फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

बुलढाणा नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, रब्बी पिकाला फटका बसणार, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत
बुलढाणा नाशिकImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 11:08 AM

बुलढाणा : बुलढाण्यात (buldhana) शनिवारी अर्धा तास जोरदार अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकाला (rabi crops) फटका बसणार असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रात्री च्या दरम्यान बुलढाण्यात जोरदार अवकाळी पाऊस पडलाय, जवळपास अर्धा तास हा पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या (farmer) काढणीला आलेल्या रब्बी पिकाला धोका निर्माण झाला आहे.

5 मार्च ते 7 मार्च दरम्यान जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. या अवकाळी पावसाने आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकांतील काढणीला आलेल्या गहु, हरबरा, मका, तसेच आंबा, फळे व पालेभाज्यांना फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी..

मालेगाव, सटाणा भागात हलक्या सरी तर कळवणच्या पाच्छिम पट्टयात अंबुर्डी, चनकापूर, बोरदैवत परिसरात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. आंबा, गहू, हरबरा, मसूर वाटाणा सह कांदा उत्पादकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतपिकांवर होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

कृषी यांत्रिकीकरण योजनेत नाशिक अव्वल

नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेतून एक एप्रिल 2022 ते आतापर्यंत एकूण 14 हजार 191 शेतकरी बांधवांना अर्थसहाय्य मिळाले असून, नाशिक विभाग राज्यात अव्वल आहे. या शेतकऱ्यांना कृषी यंत्र औजारे खरेदीसाठी 75.45 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, जमाती आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना देखील देण्यात येतो. आता सन 2023-24 या वर्षासाठी अनुदानासाठी संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शेतकऱ्याच्या 2 एकरावरील हरभऱ्याच्या गंजीला आग

बुलढाणा जिल्ह्यातील निवाना येथील शेतकरी जयप्रकाश जाधव यांनी आपल्या 2 एकर शेतातील हरबरा काढून त्याची गंजी लावली होती. मात्र रात्रीच्या वेळी त्या हरभऱ्याच्या गंजीला आग लागली आणि आगीत संपूर्ण हरबरा जळून खाक झाला. ही आग अज्ञात व्यक्तीने आग लावली असल्याचं संशय व्यक्त केला जात असून या आगीत तब्बल 25 क्विंटल च्या जवळपास हरबरा जळून खाक झाला आहे. त्यामुळे जाधव या शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे.

दर वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली

गेल्या चार-पाच दिवसांपासून नाशिकमध्ये कांदा पाठोपाठ पालेभाज्यांचे देखील दर घसरल्याचे चित्र होते. मेथी, कांदा पात, कोथिंबीर या पालेभाज्यांना पाच ते सात रुपये इतका कमी दर मिळत होता. मात्र आता हे दर पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून, चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांना दहा ते बारा रुपये इतका दर सुरू आहे. मात्र कमी प्रतीच्या पालेभाज्यांना अजूनही दोन ते पाच रुपये इतका कमीच दर सुरू आहे. पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक कमी झाल्यास आणखी दर वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.