AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhendwal Bhavishyavani : पाऊस भरपूर पण पीक साधारण, राजा कायम पण ताण वाढेल, भेंडवळची भविष्यवाणी

लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेली बुलडाण्यातील भेंडवळची पीक-पाण्याबाबतची भविष्यवाणी (Bhendwal Bhavishyavani Buldhana)  अखेर जाहीर झाली.

Bhendwal Bhavishyavani : पाऊस भरपूर पण पीक साधारण, राजा कायम पण ताण वाढेल, भेंडवळची भविष्यवाणी
| Updated on: Apr 27, 2020 | 2:10 PM
Share

बुलडाणा : लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेली भेंडवळची पीक-पाण्याबाबतची भविष्यवाणी (Bhendwal Bhavishyavani Buldhana)  अखेर जाहीर झाली. केवळ चौघांच्या उपस्थितीत भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर करण्यात आलं. त्यानुसार “यंदा पाऊस भरपूर होईल पण पीक परिस्थिती साधारण राहील, देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल, देशाचा राजा कायम राहील” असं भाकीत भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवलं आहे.(Bhendwal Bhavishyavani Buldhana)

बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी इथे पीक-पाणी, पाऊसमान याबाबतचा अंदाज वर्तवला जातो. यंदा लॉकडाऊनमुळे ही घटमांडणी अक्षय तृतीयेला होऊ शकली नाही. प्रसारमाध्यमांना आणि शेतकऱ्यांना हुलकावणी देत आज अखेर घटमांडणीचे भाकीत वर्तवण्यात आले. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर महाराज यांनी सकाळी सूर्योदयावेळी हे भाकीत वर्तविले.

भेंडवळची भविष्यवाणी यंदा वर्तवण्यात आलेल्या भाकितामध्ये “पाऊस मोठ्या प्रमाणात होईल, देशावर नैसर्गिक संकट ओढवेल, देशाचा राजा कायम राहील मात्र त्याच्यावर प्रचंड ताण वाढेल. संरक्षण व्यवस्था मजबूत जरी असली तरी शत्रूच्या कारवाया सुरुच राहतील, त्यामुळे सर्वांना सोबत राहून संकटाशी सामना करावा लागेल”, असं म्हटलं आहे.

भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणती भाकितं?

पाऊस – जून महिन्यात पाऊस साधारण असेल, जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, ऑगस्टमध्ये कमी अधिक पाऊस होईल, सप्टेंबर महिन्यात सार्वत्रिक आणि जास्त पाऊस होईल.

अवकाळी पाऊस पडेल : यावर्षी चारही महिन्यात पावसाळा चांगला असून पीक परिस्थिती साधारण असले. अतिवृष्टी होऊन महापुराचाही अंदाज. पाऊस चांगला असल्याने जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होईल.

पीक – ज्वारी, तूर, गहू, कपाशी, सोयाबीन सर्व पीकं चांगली येतील, पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. पहिल्याच महिन्यात पीक पेरणी केली जाईल, चारा टंचाई भासेल.

नैसर्गिक आपत्ती – पृथ्वीवर नैसर्गिक आणि कृत्रीम आपत्तीसुद्धा येऊ शकते, रोगराईचे संकट येईल, त्यामुळे देशातील आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत होईल.

राजा कायम – राजा कायम आहे मात्र आर्थिक स्थिती खालावू शकते आणि जगावर आर्थिक संकट येईल. राजावरील ताण वाढेल, शिवाय संरक्षण खात्यावरही ताण येईल. परकीयांची घुसखोरी वाढेल.

(Bhendwal Bhavishyavani Buldhana)

गर्दी टाळून भविष्यवाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून यावर्षी भेंडवळ घटमांडणी होणार नाही, असे वाघ महाराजांकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र ही 350 वर्षाची परंपरा खंडित होऊ नये यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सारंगधर महाराज यांना फोनद्वारे विनंती केली. त्यानुसार केवळ चंद्रभान महाराज यांच्या वंशजांसह चार लोकांनी अक्षय तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली आणि आज सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण करत त्यानुसार यावर्षिचे भाकित वर्तविले.

या घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी केवळ विदर्भातीलच नव्हे तर राज्यभरातील शेतकरी याठिकाणी येत असतात. शिवाय त्यांची पेरणीची कामे सुद्धा या भाकितांवर अवलंबून असतात. भाकीत ऐकूनच शेतकरी वर्ग शेतीचे नियोजन करतात. गर्दी होऊ नये म्हणून वाघ महाराजांनी यावर्षी घटमांडणी होणार नाही म्हणून जाहीर केले होते. मात्र प्रसारमाध्यमे आणि शेतकरी वर्गाला हुलकावणी देत आज अखेर हे भाकीत वर्तवले.

भेंडवळची घटमांडणी कशी केली जाते?

दरवर्षी अक्षयतृतीयेला सूर्यास्तापूर्वी गावाबाहेर शेतात वाघ घराण्याचे वंशज घटाची मांडणी करतात. घटामध्ये अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा गोलाकार मांडली जातात. घटाच्या मध्यभागी खोल खड्डा करुन त्यात पावसाळ्याच्या 4 महिन्यांचे प्रतिक असलेली 4 मातीची ढेकळे ठेवली जातात. त्यावर पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोळी, कुरडई, तर खाली विड्याच्या पानावर सुपारी ठेऊन प्रतिकात्मक मांडणी केली जाते.

दुसर्‍या दिवशी सूर्योदयापूर्वी या घटात झालेल्या बदलावरुन भविष्य वर्तवण्यात येते. पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं. आतापर्यंत हे भाकित वयोवृध्द रामदास वाघ हे कथन करायचे. मात्र, त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर वाघ हे भविष्य कथन करतात.

संबंधित बातम्या 

Bhendwal Prediction | भेंडवळच्या भविष्यवाणीला लॉकडाऊनचा फटका, 300 वर्षांची परंपरा खंडित

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.