शेतकऱ्याने टमाटर विकून दीड कोटीचं कर्ज फेडलं, उत्पन्न जाणून घेतल्यास बसेल धक्का

गेल्या वर्षी टमाटरचे भाव घसरल्याने दीड कोटी रुपयांचं नुकसान झालं. त्यांनी सावकाराकडून उधार घेऊन शेती केली होती.

शेतकऱ्याने टमाटर विकून दीड कोटीचं कर्ज फेडलं, उत्पन्न जाणून घेतल्यास बसेल धक्का
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 3:17 PM

हैदराबाद : महागाईमुळे जनता नाराज आहे. पण, हिरवा भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. विशेषता टमाटर विक्रेत्या शेतकऱ्यांची कमाई कित्तेक पटीने वाढली आहे. देशात कित्तेक शेतकरी टमाटर विकून करोडपती झाले आहेत. यापैकी एक शेतकरी आहेत मुरली (वय ४८). मुरली यांनी टमाटर विकून चार कोटी रुपयांचा फायदा मिळवला. यामुळे संपूर्ण देशात त्यांची चर्चा होत आहे. मुरली हे आंध्र प्रदेशातील चितूर जिल्ह्यात राहतात. बऱ्याच वर्षांपासून ते टमाटरची शेती करतात.

मुरली यांना यापूर्वी कधी एवढा नफा मिळाला नाही. गेल्या वर्षी टमाटरचे भाव घसरल्याने दीड कोटी रुपयांचं नुकसान झालं. त्यांनी सावकाराकडून उधार घेऊन शेती केली होती. त्यामुळे दीड कोटी रुपयांचे कर्जदार झाले होते. पण, यंदा ते टमाटरच्या विक्रीतून मालामाल झाले. टमाटरची किंमत चांगली असल्याने टमाटर विक्री करून चार कोटी रुपये त्यांनी मिळवले.

४५ दिवसांत २ कोटींचा फायदा

जास्त किंमती मिळावी म्हणून मुरली यांनी मेहनत केली. टमाटर विक्रीसाठी त्यांनी १३० किलोमीटर दूरवर विक्री केली. टमाटर विक्रीसाठी ते कोलारला जात होते. दीड कोटी रुपयांचे कर्ज फेडून मुरली ४५ दिवसांत २ कोटी रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.

जमीन खरेदी करण्याचा विचार

मिळालेल्या नफ्याच्या पैशातून आता ते जमीन खरेदी करण्याचा विचार करत आहेत. शास्त्रीय पद्धतीने ते टमाटरची शेती करण्याचा विचार करत आहेत. विशेष म्हणजे मुरली गावात जमीन खरेदी करण्यासाठी जमीन पाहत आहेत.

ईश्वर गायकरही करतात टमाटरची शेती

महाराष्ट्रातील शेतकरी ईश्वर गायकर यांनी टमाटर विक्री करून २ कोटी ८० लाख रुपये मिळवले. ईश्वर गायकर हेसुद्धा गेल्या सात वर्षांपासून १२ एकर जागेत टमाटरची शेती करतात. परंतु, यंदाएवढा नफा यापूर्वी त्यांना कधीच मिळाला नाही. यापूर्वी त्यांना बऱ्याच वेळा टमाटरच्या शेतीत नुकसान झाले. २०२१ साली ईश्वर गायकर यांना टमाटर शेतीत १८-२० लाख रुपयांचा नुकसान झाला होता.

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.