बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय, पणन मंडळाच्या नियमातही होणार बदल

राज्यातील बाजार समित्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियम, 1963 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बाजार समितीमधील रचना आणि करावयाचे बदल त्याअनुशंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत.

बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय, पणन मंडळाच्या नियमातही होणार बदल
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 5:13 PM

मुंबई : राज्यातील बाजार समित्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियम, 1963 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय(State Cabinet Meeting)  मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ( Market Committee) बाजार समितीमधील रचना आणि करावयाचे बदल त्याअनुशंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत. प्रशासकीय मंडळावर किती सदस्य असावेत तसेच शेतीमाल व अन्य उत्पादनाच्या खरेदीवर समितीला शुल्क आकरण्याचा अधिकार याकिराताही नियमावली जारी करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे होते.

संचालकाच्या निवडीत ‘यांनाच’ मतदानाचा हक्क

बाजार समितीवर संचालक निवडून देण्यासाठी ज्या बहुउद्देशिय सहकारी संस्था त्यांच्या सदस्यांना पीक कर्ज वितरीत करतात त्यांनाच मतदानाचा अधिकार देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. बाजार समितीवर नियुक्त करावयाच्या अशासकीय प्रशासकीय मंडळाची संख्या आता 7 पेक्षा जास्त असणार नाही. बाजार समितीच्या बाजार आवारात नियमनात नसलेल्या शेतमाल व अन्य उत्पादनाच्या खरेदी-विक्रीवर बाजार समितीला उपयोगिता शुल्क घेण्याचा हक्क असेल. म्हणजे बाजार समितीच्या आवारात कोणी शेतीमालाची खरेदी-विक्री करीत असेल तर कर आकाराच्या स्वरुपात सेस मिळणार आहे.

सचिवाची नेमूणकही शासनामार्फतच होणार

बाजार समितीवर देखरेख शुल्क वसुलीसाठी बाजार समितीवर शासनाचा कर्मचारी नियुक्त करण्याची तरतूद वगळण्यात येईल व देखरेख फी “5 पैसे” ऐवजी “10 पैसे” अशी करण्याचे प्रस्तावित आहे. बाजार समितीवर सचिव नियुक्त करण्यासाठी सद्याची राज्य पणन मंडळाने सचिव म्हणून नियुक्त करावयाच्या व्यक्तींची यादी तयार करण्याबाबतची तरतूद वगळण्यात येईल. बाजार समितीवर सचिव म्हणून सहकार अधिकारी वर्ग 2 ह्या पेक्षा वरच्या दर्जाचा अधिकारी शासनाला नेमता येईल. राज्य कृषि पणन मंडळास त्यांना देय रक्कमाबाबत वाद उद्भवल्यास न्यायाधिकरणाकडे दाद मागता येईल अशी सुधारणा करण्यात येईल.

संबंधित बातम्या :

Pik Vima Yojana : पीकांच्या विम्याची प्रीमियम रक्कम कशी ठरवली जाते? प्रत्येक शेतऱ्यासाठी महत्वाची बातमी

रब्बीत कपाशीची लागवड फायद्याची की नुकसानीची ? शिफारस नसतानाही शेतकऱ्यांचे धाडस

सोयाबीनची वाटचाल पुन्हा चढ्या दराकडे, केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.