AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

80 कोटी नागरिकांना मोफत गहू-तांदूळ मिळणार, केंद्र सरकारची धान्य वितरणाला मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 80 कोटी जनतेला गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य पुरवठा करण्याची घोषणा केली होती. (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana)

80 कोटी नागरिकांना मोफत गहू-तांदूळ मिळणार, केंद्र सरकारची धान्य वितरणाला मंजुरी
Pradhanmantri Garkib kalyan anna yojna
| Updated on: May 06, 2021 | 10:43 AM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 एप्रिलला देशातील 80 कोटी जनतेला गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य पुरवठा करण्याची घोषणा केली होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा तिसरा टप्पा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेंअतर्गत पात्र नागरिकांना दोन महिन्याचं धान्य मोफत देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटनं धान्य वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. (Central Government cabinet meeting approves allocation of additional food grain to national food security act)

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना फायदा

केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या निर्णयाचा फायदा देशातील 79 कोटी 88 लाख जनतेला होणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोपत देण्यात येणार आहे. देशातील विविध राज्यातील अन्नपुरवठा आणि सार्वजनिक वितरण विभागांद्वारे याच वितरण करण्यात येणार आहे.

पियुष गोयल यांचं ट्विट

25 हजार कोटींचा खर्च

केंद्र सरकारनं दोन महिन्यांचं धान्य 79 कोटी 88 लाख लोकांना देण्याचं जाहीर केलेले आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारवर 25 हजार 333 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर गरीब कल्याण योजनेची घोषणा केली होती. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत धान्य वितरण सुरु कऱण्यात आलं आहे

महाराष्ट्र सरकारकडून यापूर्वीच घोषणा

महाराष्ट्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढळ्यानं कडक निर्बंध लागू करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोर गरीबांसाठी 5476 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. राज्यातील गोरगरीबांना निर्बंध लागू झाल्यापासून एक महिना 3 किलो गहू, आणि 2 किलो तांदूळ देण्यात येणार. तसेच शिवभोजन थाळीही महिनाभर मोफत देण्याची घोषणा केली होती.

संबंधित बातम्या:

हवाईमार्गे ऑक्सिजन आणण्याची परवानगी द्या; मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना फेसबुकवरून आवाहन

Uddhav Thackeray On Maharashtra Lockdown LIVE : राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी

Central Government cabinet meeting approves allocation  Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana additional food grain to national food security act beneficiaries for the months of May and June

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.