Fertilizer Rate : ज्याची भीती शेतकऱ्यांना तेच घडलं, डीएपी खत दीडशे रुपयांनी महागलं

खरीप हंगामाच्या अनुशंगाने आतापासूनच मागणीनिहाय खताचा पुरवठा करण्यावर सरकारने भर दिला आहे. त्यामुळे ऐनवेळी मागणीत वाढ अन् पुरवठा कमी अशी परस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुरवठ्याला सुरवातही झाली आहे. सरकारकडून एवढे नियोजन केले जात असले तरी दरावर नियंत्रण ठेवण्यास अपयश आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्याची भीती होती तेच अखेर खरिपाच्या तोंडावर घडले आहे.

Fertilizer Rate : ज्याची भीती शेतकऱ्यांना तेच घडलं, डीएपी खत दीडशे रुपयांनी महागलं
रासायनिक खत
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 2:11 PM

नांदेड:  (Kharif Season) खरीप हंगामाच्या अनुशंगाने आतापासूनच मागणीनिहाय खताचा पुरवठा करण्यावर सरकारने भर दिला आहे. त्यामुळे ऐनवेळी मागणीत वाढ अन् पुरवठा कमी अशी परस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुरवठ्याला सुरवातही झाली आहे. (Central Government) सरकारकडून एवढे नियोजन केले जात असले तरी दरावर नियंत्रण ठेवण्यास अपयश आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्याची भीती होती तेच अखेर खरिपाच्या तोंडावर घडले आहे. या हंगामात (DAP Fertilizer) डीएपी खताची सर्वाधिक मागणी असते. नेमक्या याच खताच्या दरात तब्बल दीडशे रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे डीएपी खताची बॅग ही आता 1 हजार 350 रुपयांना मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यासाठी पीपीएल या कंपनीचे एक हजार टन डीएपी खत प्राप्त झाले आहे.

खरीप हंगामात सर्वाधिक वापर डीएपी खताचा

उत्पादनवाढीसाठी शेतकरी खऱीप हंगामात डीएपी खतालाच पसंती देतात. सर्वच पिकांसाठी हे खत संतुलित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या खतालाच अधिकची मागणी हे दरवर्षी असते. खरिपातील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर, हरभरा आणि गव्हासाठी याच खताचा अधिकचा वापर केला जातो. दरवर्षी डीएपी खताच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. असे असूनही मागणीच्या तुलनेत पुरवठा हा होत नाही. कृषी विभागाकडून वेगवेगळ्या खताचा वापर करण्याचे आवाहन केले जात असले तरी शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

आंतराष्ट्रीय बाजारपेठेचाही परिणाम

रशिया-युक्रेन युध्दामुळे रासायनिक खतासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचा पुरवठा वेळेत झाला नाही. शिवाय भारताला सर्वाधिक खत हे रशियामधून पुरवले जाते. पण यंदा युध्दजन्य परस्थितीमुळे आयातीवर परिणाम झाला आहे. खरीप हंगाम अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना देखील खताचा पुरवठा झालेला नव्हता. सध्या साठवणूकीतले खत सरकारने जिल्हानिहाय पुरवले आहे.

18:46 (डीएपी) वर काय पर्याय आहे

शेतकऱ्यांची मानसिकताच झाली आहे की 18:46 या खतानेच पिकाला चांगला उतार येतो. या खताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने त्याची विक्री करतात. मात्र, 18:46 हे खत जरी सहज उपलब्ध नाही झाले तरी 10:26:26, 12:32:16, 15:15, 20:20:00 या खतांचा पर्यांय शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय मिश्र खतांचा वारर करुनही भरघोस उत्पादन घेता येते. मात्र शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलण्यााची आवश्यकता आहे. अखेर कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली खते आहेत त्यामध्ये नायट्रोजन, फॅास्परस यांचे मिश्रण करुनही वापर करता येत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Yellow Watermelon : जे जे नवं ते बारामतीकरांना हवं, पिवळे कलिंगड पाहून काय म्हणाले मंत्री जयंत पाटील?

Milk Rate : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, गायीच्या पाठोपाठ म्हशीच्या दूध दरातही वाढ, वाढत्या उन्हाचा काय परिणाम?

Vineyard : उत्तर महाराष्ट्रात नुकसान तरीही पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे धाडस, म्हणे उसापेक्षा द्राक्षाला गोडवा

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.