Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर शेतकरी मात्र वाऱ्यावर, अजित पवारांनीच मांडला सरकारापुढे नुकसानीचा आढावा, मदतीचे काय?

नुकसानीची दाहकता पाहता आतापर्यंत पंचनामे प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्रीच नसल्याने नेमके चित्र काय हेच समोर येत नाही. प्रशासकीय अधिकारी हे पंचनामे सुरु असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे अधिकृत नुकसानीचा आकडा हा येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर असा सवाल उपस्थित होत आहे.

Ajit Pawar : मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर शेतकरी मात्र वाऱ्यावर, अजित पवारांनीच मांडला सरकारापुढे नुकसानीचा आढावा, मदतीचे काय?
विरोधी पक्षनेते अजित पवार
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 12:48 PM

मुंबई : (Heavy Rain) अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे (Crop Damage) नुकसान झाले आहे. गतवर्षी खरिपाच्या अंतिम टप्प्यात नुकसान झाले होते तर यंदा पेरणी झाली अन् पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सबंध राज्यात विदारक स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे हे राज्य शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांचे असे प्रत्येक सभेत म्हणायचे आणि त्याच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिल्ली दौरे करणे बरोबर नाही. राज्यात तब्बल 10 लाख हेक्टराहून अधिकच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे (Kharif Season) खरीप नुकसानीपोटी हेक्टरी 75 हजार तर फळ बागांच्या नुकसानीपोटी हेक्टरी 1 लाख 50 हजाराची मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे सत्कार स्विकारण्यापेक्षा आता मदतीकडेही लक्ष द्यावे असा खोचक टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

पंचनामेही रखडेलेलच

नुकसानीची दाहकता पाहता आतापर्यंत पंचनामे प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्रीच नसल्याने नेमके चित्र काय हेच समोर येत नाही. प्रशासकीय अधिकारी हे पंचनामे सुरु असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे अधिकृत नुकसानीचा आकडा हा येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर असा सवाल उपस्थित होत आहे. पंचनामे केवळ तोंडी झाले आहेत. कागदोपत्री आणखी संबंधित अधिकारी हे बांधापर्यंत पोहचलेलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार तरी कशी असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे.

केवळ मनुष्यहानी झालेल्या ठिकाणीच मदत, इतरचे काय?

राज्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 110 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यांच्या कुटुंबियांना 4 लाखाची मदत मिळाली आहे. पण इतर कोणत्याच बाबतीमधील मदत मिळालेले नाही. अनेक शेतकऱ्यांचे पशूधन दगावले आहे, घराची पडझड झाली आहे मात्र याकरिता असलेली मदत अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे केवळ अश्वासने न देता आता प्रत्यक्ष मदतीबाबत योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

सत्कार स्विकारण्यापेक्षा मदत द्या

मुख्यमंत्री हे राज्याच्या दौऱ्यावर असून ते मध्येच दिल्लीवारीवर जात आहेत. राज्यातले सर्व प्रश्न रखडलेले आहेत. खाते वाटपही झालेले नाही. असे असताना राज्याच्या दौऱ्यात ते सत्कार स्विकारण्यात दंग आहेत. हे सुरु असले तरी जनतेचे प्रश्न मिटणे गरजेचे आहे. सत्कार स्विकारण्यारपेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. असंवेदनशील सरकारचे हे लक्षण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत ही काळाची गरज असल्याचेही पवार यांनी सांगितले आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.