Cotton: हंगामाच्या सुरवातीपासून कापसाने तारले अंतिम टप्प्यात काय होणार? शेतकरी संभ्रम अवस्थेत
सध्या कापूस अंतिम टप्प्यात आहे. वाढीव दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनप्रमाणेच कापसाचीही साठवणूक केली होती. पण गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनप्रमाणेच कापसाच्या दरातही चढ-उतार होत आहे. त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक हा प्रश्न कायम आहे.
परभणी : खरिपातील केवळ कापसाचे दर हे सरासरीच्या तुलनेत अधिक राहिलेले आहेत. शिवाय हंगामाच्या सुरवातीपासून सुरु झालेली दरवाढ ही आतापर्यंत कायम राहिली होती. त्यामुळे उत्पादन घटले तरी त्याची कसर अधिकच्या दरातून भरुन निघालेली आहे. सध्या कापूस अंतिम टप्प्यात आहे. वाढीव दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनप्रमाणेच कापसाचीही साठवणूक केली होती. पण गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनप्रमाणेच (Cotton Rate) कापसाच्या दरातही चढ-उतार होत आहे. त्यामुळे (Soybean) सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक हा प्रश्न कायम आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची आवक ही 400 क्विंटल होत असून सरासरी दर हा 9 हजार 200 आहे. त्यामुळे गेल्या 4 महिन्यातील हा सर्वात कमी दर असून आता कापूस वेचणी तर संपलेली आहे पण काही (Cotton Stock) शेतकऱ्यांनी साठवणूक केली होती. भविष्यात दरवाढ होईल का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. 10 हजारावर गेलेला कापूस आता थेट 9 हजार 200 वर य़ेऊन ठेपलेला आहे.
गतआठवड्यात कसे राहिले कापसाचे दर
कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी दरामुळे सर्वाचे लक्ष हे या पिकावरच आहे. गेल्या 50 वर्षात जो दर कापसाला मिळालेला नव्हता तो यंदा मिळालेला आहे. पावसामुळे उत्पादनात घट झाली असली तरी वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 500 क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर कमाल दर 8 हजार 400 ते 9 हजार 800 पर्यंतचे दर होते. पण दरात वाढ किंवा वाढलेले दर हे स्थिर राहत नसल्यामुळे शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती होत आहे.
काय आहे कृषीतज्ञांचा सल्ला?
खरिपातील केवळ कापूस पिकामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. बाजारपेठेत वाढलेली मागणी आणि प्रत्यक्षात झालेले उत्पादन यामध्ये मोठी तफावत होती. त्यामुळे सबंध हंगामात कापसाचे दर हे टिकून राहिले होते. शिवाय शेतकऱ्यांनीही योग्य दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक हाच मंत्र शेवटपर्यंत अवलंबला त्यामुळे दरही टिकून राहिले आणि शेतीमालाचे योग्य मुल्यमापनही झाले. त्यामुळे अंतिम टप्प्यातही शेतकऱ्यांनी अधिकचा काळ कापसाची साठवणूक न करता टप्प्याटप्प्याने का होईना विक्री करणे आवश्यक आहे. तरच नुकसान टळणार असल्याचे कृषितज्ञ संतोष घसिंग यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात 60 हजार 365 क्विंटल कापसाची खरेदी
ऑक्टोंबर महिन्यापासून कापसाच्या हंगामाला सुरवात झाली होती. यंदा क्षेत्रात घट झाली असली तरी याच पिकाने शेतकऱ्यांना आधार दिलेला आहे. जिल्ह्यात गेल्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये खासगी आणि जाहीर लिलाव पध्दतीने 60 हजार 365 क्विंटल कापसाची खरेदी झाली असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सांगितले आहे. शिवाय दर टिकून राहिले तर यामध्ये अणखीन वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
Agricultural Pump : कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित, मागणी 5 हजाराची तोडगा 3 हजारावर
सोयाबीनचे दर स्थिर आता तुरीवर लक्ष, टायमिंग साधले तरच शेतकऱ्यांचा फायदा..!