खरीप अंतिम टप्प्यात तरीही शेतकऱ्यांना विमा रकमेचीच प्रतिक्षा, वाढीव विमा रकमेसाठी राष्ट्रवादीचा रास्तारोको

नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपयांचा विमा देण्याच्या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रास्तारोको करण्यात आला होता. अतिवृष्टीने नुकसान होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. असे असतानाही विमा कंपन्या ह्या वेळकाढूपणा करीत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणीही या आंदोलना दरम्यान करण्यात आली होती.

खरीप अंतिम टप्प्यात तरीही शेतकऱ्यांना विमा रकमेचीच प्रतिक्षा, वाढीव विमा रकमेसाठी राष्ट्रवादीचा रास्तारोको
विमा रकमेच्या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या वतीने रास्तारोको करण्यात आला होता.
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 12:50 PM

उस्मानाबाद : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. शिवाय विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. त्यामुळे नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपयांचा विमा देण्याच्या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रास्तारोको करण्यात आला होता. अतिवृष्टीने नुकसान होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. असे असतानाही विमा कंपन्या ह्या वेळकाढूपणा करीत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणीही या आंदोलना दरम्यान करण्यात आली होती.

खरीप पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उत्पादनातून नाहीतर किमान विमा रकमेतून का होईना चार पैसे पदरात पडतील त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विमा रक्कम कंपनीकडे अदा केलेली आहे. पण आता परताव्याच्या दरम्यान वेळकाढूपणा केला जात आहे. शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथील सोलापूर-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी रास्तारोको करण्यात आला होता.

बजाज अलंयन्स कंपनीवर कारवाईची मागणी

शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांचा विमा काढला होता. शिवाय पावसामुळे पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. कृषी विभाग आणि कंपनीच्या प्रतिनीधींनी पंचनामेही केले. मात्र, या दरम्यान कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. असे असतानाही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात अधिकतर बजाज अलंयन्स कंपनीने अधिक प्रमाणात विमा काढलेला आहे. वेळेत शेतकऱ्यांचे पैसे अदा न केल्याने या विमा कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावळी आंदोलकांनी केली होती.

हेक्टरी 20 हजाराच्या विम्याची मागणी

यंदा पावसामुळे खरिपातील कोणतेच पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. अधिकचे नुकसान लक्षात घेता हेक्टरी 20 हजाराची भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. सोलापूर-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावरच शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रास्तारोको केल्याने दीड तास वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

उपमुख्यमंत्र्याच्या आदेशाचे होणार का पालन

विमा कंपन्यांनी वेळेत शेतकऱ्यांचे पैसे अदा केले नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेशच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत दिले होते. आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीच आंदोलन केले असून बजाज अलंयन्स कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या कंपनीवर काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

E-Shram Yojna : आता शेतमजुरांनाही मिळणार अपघात विम्याचे कवच ; असे मिळवा ई-श्रम कार्ड…!

तुरीचा काढणीपूर्वीच झाला खराटा, काय आहे उपापयोजना ? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

सोयाबीन दरवाढीला आता सरकारचाही ‘सपोर्ट’, काय होणार नेमका परिणाम?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.