Crop Loan : शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्जाचा ‘आधार’, नंदूरबार जिल्हा प्रशासनाचे नियोजन काय?

निसर्गाचा लहरीपणा त्यामध्येच बाजारपेठेतील चढ-उतार यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. शिवाय आता खरीपपुर्व मशागतीची आणि पेरणीची कामे सुरु होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा व्हावा या दृष्टीकोनातून राज्य सरकारने धोरणांमध्येच बदल केला आहे. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या योजनांची लागलीच अंमलबजावणी ही करावी लागणार आहे.

Crop Loan : शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्जाचा 'आधार', नंदूरबार जिल्हा प्रशासनाचे नियोजन काय?
पीक कर्ज
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 10:41 AM

नंदूरबार : निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम (Kharif Season) खरीप आणि आता रब्बी हंगामावरही झाला आहे. यामुळे उत्पादनात घट झाली असून आता शेतीकामे कशी करावीत असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. मात्र, यंदा (Maharashtra) राज्यातील शेतकऱ्यांना (Crop Loan) पीक कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. खरीप हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पीक कर्जाला सुरवात झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांना हे कर्ज वेळेत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना राज्य सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत. सध्या ही प्रक्रिया सूरु झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामासाठी १ हजार २३७ कोटी ८३ लाख रुपयांचा कर्ज वाटपाचा लक्षांक जिल्हा प्रशासनाने ठेवला आहे. राष्ट्रीयकृत, खासगी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिलं जाणार आहे.

गरजेच्या वेळीच कर्जाचा पुरवठा

निसर्गाचा लहरीपणा त्यामध्येच बाजारपेठेतील चढ-उतार यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. शिवाय आता खरीपपुर्व मशागतीची आणि पेरणीची कामे सुरु होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा व्हावा या दृष्टीकोनातून राज्य सरकारने धोरणांमध्येच बदल केला आहे. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या योजनांची लागलीच अंमलबजावणी ही करावी लागणार आहे. एप्रिल महिन्यापासूनच पीक कर्ज वाटपाला सुरवात करावी आणि 30 जूनपर्यंत प्रत्येख शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळावा असे नियोजन करण्याचे आदेश मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आले आहेत.

सातबारा घरपोच सेवा, योजनेचा लाभ घ्यावा

जिल्ह्यातील नवीन नमुन्यातील शेतकरी खातेदारांना शंभर टक्के सातबारा घरपोच करण्यात आले आहे. त्यामुळे कुठलीही शेतकरी कर्ज वाटप लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशिक्षण घेत आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामापूर्वी कर्ज वाटप करण्याच्या अंदाज पालकमंत्री के सी पाडवी यांनी केला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी या कर्जाचा उपयोगही शेती कामासाठीच केला तरच त्याचा फायदा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

पीक कर्जाची अशी ही प्रक्रिया

पीककर्जाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 7/12 उतारा, 8 अ, शेतीचा नकाशा, फेरफार, मुल्यांकन म्हणजेच व्हॅल्युनेशन, सर्व रिपोर्ट याशिवाय आवश्यक असल्यास वकिलांनी सुचवलेले इतर कागदपत्रे, आधार कार्ड झेरॉक्स आणि 3 फोटो हे आवश्यक आहे. 31 जूनपर्यंत कर्ज मिळवून देण्याचे सरकारचे धोरण आहे. खरीपातील पेरणी होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना हे कर्ज मिळाले तर त्याचा अधिकचा लाभ होणार आहे. त्यामुळे आतापासूनच ही प्रक्रिया सुरु झाली तर बॅंकांना त्यांचे उद्दीष्ट साधता येणार आहे शिवाय शेतकऱ्यांनाही त्याचा योग्य वापर होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.