अवकाळीमुळे आंबा बागांचे नुकसान आता वाढत्या थंडीचा काय होणार परिणाम? शेतकऱ्यांचे लक्ष वातावरणाकडे

अवकाळीचा कहर झाला आणि वातावरणातील बदलाचा फटका फळ बागायत शेतकऱ्यांना बसलेला आहे. सर्व काही नुकसानीचे होत असताना आता या गुलाबी थंडीने आंबा बगायत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सध्याच्या थंडी आणि कडक ऊनावरच आंब्याचा मोहर अवलंबून आहे. आता ही थंडी कीती काळ टिकून राहते यावर सर्वकाही अवलंबून आहे.

अवकाळीमुळे आंबा बागांचे नुकसान आता वाढत्या थंडीचा काय होणार परिणाम? शेतकऱ्यांचे लक्ष वातावरणाकडे
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 10:12 AM

देवगड : अवकाळीचा कहर झाला आणि वातावरणातील बदलाचा फटका फळ बागायत शेतकऱ्यांना बसलेला आहे. सर्व काही नुकसानीचे होत असताना आता या गुलाबी थंडीने आंबा बगायत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सध्याची थंडी आणि कडक ऊनावरच आंब्याचा मोहर अवलंबून आहे. आता ही थंडी कीती काळ टिकून राहते यावर सर्वकाही अवलंबून आहे. (Devgad) देवगड परिसरात गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेली थंडी कायम राहिली तर मात्र, मोहर फुटत असलेल्या ( Hapus Mango) हापूस आंब्याच्या चांगल्या हंगामाची अपेक्षा आहे. सलग 21 दिवस जर 14 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान राहिले तर आंब्याला चांगला मोहर फुटतो असे कृषीतज्ञांचे मत आहे. असेच वातावरण राहिले तर 15 मार्चपर्यंत हापूस बाजारात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अजून 15 दिवस थंडी राहिल्यास काय होणार परिणाम

सलग 21 दिवस जर तापमानात घट झाली आणि थंडीचा जोर वाढला तर त्याचा परिणाम थेट आंब्यावरील मोहरावर होणार आहे. किमान थंडीमुळे का होईना मोहर वाढतोय ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. साधारणत: कल्टारचा वापर केलेल्या बागांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर नैसर्गिकरीत्या डिसेंबर जानेवारीमध्ये आंब्याला मोहर येतो याशिवाय नैसर्गिक मोहरही वाढतो. दुसऱ्या टप्प्यात मोहराविणा राहिलेल्या बागा आता वाढत्या बहरतील आणि उत्पादनात वाढ होईल असा अंदाज वर्तवलेला आहे. पडलेली थंडी पंधरवडाभर कायम राहिली तर मोहर फुटण्यास मदतगार राहील. पोषक वातावरण राहिल्यास यंदाचा हंगाम चांगला राहील असेच संकेत आहेत.

कलमांना पालवी, शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या

वातावरणातील बदलामुळे देवगड भागातील तळेबाजार, वरेरी, शिरगाव, किंजवडे या भागातील कलम केलेल्या आंब्यांना आता पालवी आली असून मोहर फुटणार आहे. यंदा वातावरणातील बदलामुळे आंबा मोहरला उशिर होत असला तरी सध्याच्या पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. नोव्हेंबर महिन्यात कलम केलेल्या आंब्यांना मोहर लागला होता. त्यामुळे आंबा हा फेब्रुवारी-मार्च महिन्यात बाजारपेठेतही दाखल होणार होता. पण मध्यंतरीच्या अवकाळी पावसामुळे 80 टक्के मोहर गळती झाली होती. पण आता पुन्हा पोषक वातावरण झाल्याने होणारे नुकसान टळणार आहे.

उत्पादनात होणार वाढ

आतापर्यंत अवकाळी आणि बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम आंबा पिकावर झालेला आहे. कारण अवकाळीमुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आंब्याला मोहरच लागलेला नाही. त्यामुळे आंबा पिकातून पदरी काय पडणार का नाही अशी स्थिती झाली आहे. मात्र, निसर्गातील बदलामुळे काही नुकसान तर काही बाबी ह्या फायद्याच्याही झाल्या आहेत. आता तिसऱ्या टप्प्यातील मोहर लागण्याची अवस्था असतानाच थंडी वाढलेली आहे. त्याचा परिणाम मोहर लगडण्यावर होत आहे. सुरुवातच संकटात झालेल्या यंदाच्या हंगामाला आता पडलेली गुलाबी थंडी दिलासा घेऊन आली आहे. या थंडीमुळे पीके बहरली तरच उत्पादनात वाढ होणार आहे.

संबंधित बातम्या :

Agrovision | नागपुरात आजपासून शेतकऱ्यांची पंढरी! चार दिवस अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन, जाणून घ्या कृषीतील आधुनिक तंत्रज्ञान

Vertical Farming | कमी जागेत फायदेशीर शेतीचा प्रकल्‍प; जाणून घ्या हाय-टेक व्‍हर्टिकल फार्मिंग?

महिला शेतकऱ्यांना कळाले गटशेतीचे महत्व, राज्य सरकारच्या निर्णयापूर्वीच परिवर्तनाची नांदी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.