Unseasonal Rain : द्राक्ष तोडणीनंतरही अवकाळीची अवकृपा सुरुच, वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट

गेल्या चार महिन्यांमध्ये अवकाळी आणि सततच्या पावसाचा सामना करीत हंगाम पार पडला पण अवकाळीचे संकट काही टळलेले नाही. अवकाळीमुळे उत्पादनात तर घट झालीच पण द्राक्षाचा दर्जाही ढासळलेला आहे. हे कमी म्हणून की काय आता वादळी वाऱ्यामुळे जत तालुक्यातील बिळूर येथील दीड एकर द्राक्ष बाग आडवी झाली आहे. अवकाळीमुळे यंदा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

Unseasonal Rain : द्राक्ष तोडणीनंतरही अवकाळीची अवकृपा सुरुच, वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट
अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागा ह्या आडव्या झाल्या आहेत.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 11:24 AM

सांगली : गेल्या चार महिन्यांमध्ये (Unseasonal Rain) अवकाळी आणि सततच्या पावसाचा सामना करीत हंगाम पार पडला पण अवकाळीचे संकट काही टळलेले नाही. अवकाळीमुळे उत्पादनात तर घट झालीच पण (Grape Quality) द्राक्षाचा दर्जाही ढासळलेला आहे. हे कमी म्हणून की काय आता वादळी वाऱ्यामुळे जत तालुक्यातील बिळूर येथील दीड एकर (Vineyard) द्राक्ष बाग आडवी झाली आहे. अवकाळीमुळे यंदा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. दर महिन्याला अवकाळी पाऊस हा ठरलेलाच आहे. द्राक्षाचे नुकासान झाले म्हणून शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीवर भर दिला मात्र, यासाठी उभारलेले शेडही वाऱ्यामुळे उध्वस्त होत आहे. त्यामुळे यंदा तेलही गेले अन् तूपही अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.

दीड एकरात समाईक द्राक्ष बाग जोपासली होती

अधिकचा खर्च आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे बिळूर येथील शेतकरी भैरापा हुचापा करेणावर आणि सिद्राया हुचापा करेणावर यांच्या दीड एकर सामाईक द्राक्ष बाग जोपासली होती. होणारा खर्च आणि उत्पादन हे निम्याने घेण्याचे ठरले मात्र, अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे दुप्पट खर्च झाला पण पदरी उत्पादन पडले नाही. या दोन शेतकऱ्यांचे तब्बल 24 लाखाचे नुकसान झाले आहे. अगोदरच उत्पादनात घट झाली होती. यातून सावरण्यासाठी शेतकरी बेदाणा निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत पण यासाठी आवश्यक असलेले शेड देखील वादळी वाऱ्यामुळे उध्वस्त होत आहेत.

सांगली जिल्ह्यात अवकाळीचा मु्क्काम वाढला

राज्यात गेल्या चार दिवसांपासून ऊन-पावसाचा खेळ असेच चित्र आहे. मराठवाडा आणि विदर्भात उन्हामध्ये वाढ होत आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये तर गेल्या दोन दिवसापासून अवकाळीच्या सरी बरसत आहेत. मंगळवारी जत तालुक्यातील बिळूर येथील शिवारातील द्राक्षबागा तर जमिनदोस्तच झाल्या पण या वादळी वाऱ्यामुळे इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळीची अवकृपा ही सुरुच आहे. हंगामाच्या सुरवातीला म्हणजे नोव्हेंबरपासून हंगामाला आणि अवकाळी पावसाला सुरवात झाली होती. आता द्राक्ष काढणी झाली आहे पण अवकाळी कायम आहे.

बेदाण्याचे उत्पादनही धोक्यातच

यंदा द्राक्षाचा दर्जा ढासळलेला आहे शिवाय बाजारपेठेत मागणीही घटली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आता बेदाणा निर्मितीवर भर देत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये बेदाणा निर्मितीसाठी शेडची उभारणी करण्यात आली आहे. शिवाय यासाठी कोरडे वातावरण असणे गरजेचे आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे बेदाणा निर्मितीला अडचणी येत आहेत. अशातच गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने यासाठी उभारण्यात आलेले शेडही उध्वस्त केले आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे संकट हे कायम आहे.

संबंधित बातम्या :

Success Story: कोरडवाहू जमिनीवर सफरचंदचा गोडवा, आधुनिकतेची कास धरत ठाकरे शेतकऱ्यानं साधली ‘ही’ किमया

Solapur Market: अवकाळीनं उत्पादन घटलं मात्र, वाढत्या उन्हानं लिंबाचा Market वाढलं

Basmati Rice: बासमती तांदळाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा, कृषी शास्त्रज्ञांची संशोधन आले कामी..!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.