दमस्क गुलाबाच्या फुलांच्या तेलाची किंमत लाखोंमध्ये, जाणून घ्या एवढी किंमत का?

बाजारात दमस्क गुलाबाची किंमत मागणीनुसार कमी-जास्त होत राहते. परंतु, या गुलाबाच्या तेलाची किंमत नेहमी १० ते १२ लाख रुपये किलो राहते.

दमस्क गुलाबाच्या फुलांच्या तेलाची किंमत लाखोंमध्ये, जाणून घ्या एवढी किंमत का?
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 3:15 PM

मुंबई : गुलाबाची शेती देशभर केली जाते. यापासून सुगंधित तेल आणि ब्युटी प्रॉडक्स तयार केले जातात. दमस्क गुलाबाची बात न्यारी. दमस्क गुलाब ही खूप चांगली व्हेरायटी आहे. दमस्क गुलाबाची किंमत सामान्य गुलाबापेक्षा जास्त राहते. दमस्क गुलाब हा मूळचा सिरीयाचा. परंतु, याची शेती आता कित्तेक देशात केली जाते. दमस्क गुलाबापासून अत्तर तयार केले जाते. याशिवाय पान मसाल्यात आणि रोज वॉटरमध्येही याचा वापर केला जातो.

गुणवत्ता असल्यामुळे दमस्क गुलाबाची मागणी देशात वाढत आहे. याचा तेल १० ते १२ लाख रुपये किलो विक्री होतो. देशातील शेतकरी दमस्क गुलाबाची लागवड करतील तर नक्कीच त्यांची आर्थिक परिस्थिती बदलेलं. विशेष म्हणजे इंस्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी (आयएचबीटी) पालमपूर, हिमाचल प्रदेशात दमस्क गुलाबावर संशोधन करत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल.

अत्तर तयार करण्यासाठी काही थेंब तेलाची गरज

बाजारात दमस्क गुलाबाची किंमत मागणीनुसार कमी-जास्त होत राहते. परंतु, या गुलाबाच्या तेलाची किंमत नेहमी १० ते १२ लाख रुपये किलो राहते. कारण एक किलो तेल काढण्यासाठी साडेतीन टन दमस्क गुलाबावर प्रक्रिया करावी लागते. दमस्क गुलाबाचे उत्पन्न खूप कमी होते. यामुळे याचे तेल महाग आहे. परंतु, तेल काढत असताना गुलाब पाणीही निघते. हे गुलाब पाणी खूप तेज असते. अत्तर तयार करण्यासाठी दमस्क गुलाबाच्या तेलाचे काही थेंब पुरेसे असतात.

फुलाच्या तेलात १०० ते १५० कंपाऊंड सापडतात

आयएचबीटीचे इंजीनीअर मोहीत शर्मा यांनी सांगितलं की, फुलांपासून काढण्यात येणार तेल किंवा याच्या रसापासून तयार केलेले अत्तर काचाच्या बॉटलमध्ये ठेवता येत नाही. याला अॅल्युमिनीअमच्या बॉटलमध्ये ठेवावे लागते. मोहीत शर्मा म्हणतात, दमस्क गुलाबाच्या फुलांच्या तेलामध्ये १०० ते १५० कंपाऊंड असतात.

गुलाबाचा सुगंध हा नेहमी दरवडतो. त्यात गुलाब पाणी, गुलाबाचे तेल काढले की, त्या सुगंधात आणखी वाढ होते. शेकडो रुपये किलो गुलाबाचे फूल विकते. त्याचे तेल काढल्यानंतर त्याचे मूल्यवर्धन होते. तेलाचे बहुविध उपयोग आहेत. त्यामुळे लाखो रुपये किलोने दमस्क गुलाबाच्या फुलाचे तेल विकले जाते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.