चिंताळा तलावातील Water Lotus ने वाढवली मत्स्य व्यवसायिकांची ‘चिंता’, तलावाला पाणवनस्पतीचे अच्छादन
शहरालगत असलेल्या चिंताळा तलावाला पाणवनस्पतीने असा काय विळखा घातला आहे की, या ठिकाणी तलाव आहे की शेत जमिन क्षेत्र अशी परस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या आठ दिवसांमध्येच या तलावाचे चित्रच बदलून गेले आहे. विशेष म्हणजे या पाणवनस्पतीमुळे या तलावातील शेकडो मासे हे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे कंत्राटी पध्दतीने मत्स्यव्यवसाय करण्यासाठी हा तलाव घेतला होता त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. वेळीच लक्ष न दिल्याने ही समस्या वाढली असून आता थेट माश्यांचा मृत्यू होत आहे.
गडचिरोली : शहरालगत असलेल्या चिंताळा (Lake) तलावाला पाणवनस्पतीने असा काय विळखा घातला आहे की, या ठिकाणी तलाव आहे की शेत जमिन क्षेत्र अशी परस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या आठ दिवसांमध्येच या तलावाचे चित्रच बदलून गेले आहे. विशेष म्हणजे या पाणवनस्पतीमुळे या तलावातील शेकडो (Fish) मासे हे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे कंत्राटी पध्दतीने (Fisheries) मत्स्यव्यवसाय करण्यासाठी हा तलाव घेतला होता त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. वेळीच लक्ष न दिल्याने ही समस्या वाढली असून आता थेट माश्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे बोली पध्दतीने मत्स्य व्यवसायासाठी तलाव घेऊन झालेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी मत्स्यपालन करणाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र, याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने व्यवसायिक अडचणीत आहेत.
8 दिवासांमध्येच बदलले चित्र
मत्स्यपालन संस्थेचे सदस्य या तलावात मासेमारी करीत असत. त्यांचे हे नित्याचेच काम पण 15 दिवसांपूर्वी या सदस्यांना तलावाच्या एका कडेला ही पाणवनस्पती आढळली. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले पण आठ दिवसांमध्येच या अनोख्या वनस्पतीने सबंध तलावालाच विळखा घातला आहे. संपूर्ण तलावाने जणू काही हिरवा शालूच पांघरला आहे असे चित्र पाहवयास मिळाले. मासेमारी व्यवसायिकांनी याची तक्राक केल्यानंतर कृषी विभागाकडून याची पाहणी करण्यात आली आहे. तेव्हा कुठे हे एक वॉटर लेट्यूस नावाची वनस्पती असून पिस्टीया स्ट्रॅटिओटेस असे शास्त्रीय नाव असल्याचे समोर आले आहे.
तलावातील शेकडो मासे मृत्यूमुखी
अवघ्या आठ दिवसांत या वनस्पतीने संपूर्ण तलावच झाकून टाकला. पुरेसा सूर्यप्रकाश व ऑक्सिजन न मिळाल्याने तलावातील मासे व इतरही जीवही मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडत आहेत. मत्स्यपालन संस्थेने जून महिन्यात येथे रोहू, कतला, ग्रासकार्प या प्रजातींचे मत्सबिज सोडले होते. आता हे मासे मोठे होऊन जवळपास एक किलोपर्यंत झाले असताना अचानक या पाणवनस्पतीमुळे तलावातील संपूर्ण जैवविविधताच धोक्यात आली आहे. शिवाय इतर जीव नष्ट झाले आहेत.
नुकसान भरपाईची मागणी
या चिंताळा तलावात मासेमारी करता यावी म्हणून मत्स्यपालन संस्थेने पैसे भरुन हा व्यवसाय सुरु केला होता. पण आता कुठे मासे विक्रीला येणार तेवढ्यात या वनस्पतीने होत्याचे नव्हते केले आहे. वॉटर लेट्यूस नावाच्या एका नव्या पाणवनस्पतीने गडचिरोली शहरातील चिंताळा तलावात शिरकाव शेकडो मासे तलावात मृत्युमूखी पडले आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी व्यावसायिकांची होत आहे.
संबंधित बातम्या :
Toor Crop : हमीभावापेक्षा दरवाढीवरच शेतकऱ्यांचे लक्ष, सोयाबीनचेच सूत्र तुरीलाही लागू..!
Positive News: संकटावर मात करुन द्राक्षाचा गोडवा सातासमुद्रा पार, सर्वाधिक निर्यात नाशिकातून
Photo Gallery : बीडात यंदाच्या हंगामात 400 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी