Solapur Market: अवकाळीनं उत्पादन घटलं मात्र, वाढत्या उन्हानं लिंबाचा Market वाढलं

यंदाच्या वर्षात शेती व्यवसयावर सर्वाधिक प्रभाव राहिला आहे तो निसर्गाचा. यामुळे नुकसानच अधिक झाले असून अवकळी पावसाचा परिणाम सर्वच पिकांवर झालेला आहे. हंगामी पिकांचीही यामधून सुटका झालेली नाही. अवकाळीचा असा प्रतिकूल परिणाम असला तरी वाढत्या उन्हामुळे कलिंगड, लिंबू या पिकांना विक्रमी दर मिळत आहे. सध्या उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत आहे.

Solapur Market: अवकाळीनं उत्पादन घटलं मात्र, वाढत्या उन्हानं लिंबाचा Market वाढलं
यंदा वाढत्या मागणीमुळे लिंबाच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 9:24 AM

सोलापूर : यंदाच्या वर्षात शेती व्यवसयावर सर्वाधिक प्रभाव राहिला आहे तो निसर्गाचा. यामुळे नुकसानच अधिक झाले असून (Unseasonal Rain) अवकळी पावसाचा परिणाम सर्वच पिकांवर झालेला आहे. हंगामी पिकांचीही यामधून सुटका झालेली नाही. अवकाळीचा असा प्रतिकूल परिणाम असला तरी वाढत्या उन्हामुळे कलिंगड, (Lemon) लिंबू या पिकांना विक्रमी दर मिळत आहे. सध्या उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असल्याने लिंबू उत्पादकांना अच्छे दिन आले आहे. (Solapur Market) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 250 रुपये किलो असा लिंबाला दर मिळत आहे. गेल्या 10 वर्षात झाले नाही ते यंदाच्या उन्हाळ्यात घडले आहे. उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असली तरी लिंबू उत्पादकांना अशा परस्थितीमध्येही दिलासा मिळत आहे.

राज्यातील सर्वाधिक दर सोलापुरात

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचेच लिंबू दाखल होत आहे. उत्पादनात घट झाल्याने आवकही अटोक्यात आहे. शिवाय लिंबाच्या आवकवरच दर ठरत आहे. गेल्या चार दिवसांपासून आवक घटल्याने लिंबाचे दर थेट 250 रुपयांवर गेले आहे. म्हणजेच एक लिंबू जवळपास 10 रुपयांना मिळत आहे. हा राज्यातील सर्वाधिक दर असल्याचे व्यापारी अल्ताफ लिंबूवाले यांनी tv9 मराठीशी बोलताना सांगितले आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये उन्हात प्रचंड वाढ झाली आहे. शीतपेयासाठी लिंबाचा वापर वाढत आहे. त्यामुळे शेतकरी बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वी किरकोळ विक्रेते येऊन बसत आहेत.

अवकाळीमुळे मात्र उत्पादन घटलं

अवकाळी पावसाची अवकृपा हंगामी पिकांवरही कायम आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे लिंबू परिपक्व होण्यापूर्वीच गळती झाली तर जमिनीवर पडलेली लिंब ही डागाळलेली आहेत. त्यामुळे दरावर परिणाम झाला आहे. ऐन लिंबा बागा बहरात असतानाच वातावरणात बदल झाल्याने उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता दर चांगला आहे पण माल कमी अशी अवस्था आहे. कधी कवडीमोल दरामुळे तर कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच असल्याचे शेतकरी नारायन साठे यांनी सांगितले आहे.

आवक घटल्यास अणखी दरात वाढ

गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 250 रुपये किलो असा दर मिळत आहे. शिवाय आतापर्यंत मागणी तेवढा पुरवठा झाला आहे. पण असेच ऊन वाढत गेले तर मागणीत वाढ आणि पुरवठ्यात कमी अशी स्थिती ओढावणार आहे. त्यामुळे भविष्यात लिंबाच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहे. यंदा मात्र, मुख्य पिकांमधून नाही पण हंगामी पिकांचा शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

Basmati Rice: बासमती तांदळाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा, कृषी शास्त्रज्ञांची संशोधन आले कामी..!

Sugar Rate : वाढत्या उन्हाबरोबर साखर उद्योगाचाही वाढला गोडवा, नेमका परिणाम काय ?

मोहीम फत्ते : कृषी विभागाचे आवाहन अन् शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने मिटला खरिपाचा प्रश्न, बियाणाच्या बाबतीत शेतकरी आत्मनिर्भर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.