Cotton : आता कापूस बियाणे विक्रीवरुन वाद, राज्य सरकारच काढणार तोडगा, नेमके प्रकरण काय?
कपाशीचे बियाणे उत्पादकांकडून मार्केटमध्ये केव्हा येणार? विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना केव्हा दिले जाणार याबाबत कृषी विभागाने एक वेळापत्रकच जारी केले आहे. मात्र, हा निर्णय कपाशीबाबतच का असा सवालही उपस्थित केला जात आहे. पण कपाशीचा पेरा वेळेपूर्वी झाला तर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढतो. शिवाय इतर पिकांवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ऐन वेळी बियाणे बाजारात दाखल झाले तर ते योग्य होईल.
पुणे : खरीप हंगामात (Cotton Seeds) कापूस बियाणे विक्रीचे वेळापत्रक (Agricultural Department) कृषी विभागाकडून सादर करण्यात आले आहे. यामध्ये 1 जून पासून विक्रेत्यांकडून हे बियाणे शेतकऱ्यांना मिळेल असे सांगण्यात आले आहे पण आता याला (Seed sellers) विक्रेत्यांकडून विरोध होऊ लागला आहे. दरवर्षी अक्षयतृतेयापासून कापशीच्या बियाणांची विक्री केली जाते यंदा मात्र, बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कृषी विभागाने तो निर्णय घेतला होता. पण या निर्णयामुळे शेतकऱ्यांचीच अडचण होईल तर बोगस बियाणांचा सुळसुळाट वाढेल असे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे हा वाद थेट राज्य सरकारच्या दरबारात गेला आहे. त्यावर काय तोडगा काढला जातो हे देखील पहावे लागणार आहे.
कपाशीच्या बाबतीतच निर्णय का?
कपाशीचे बियाणे उत्पादकांकडून मार्केटमध्ये केव्हा येणार? विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना केव्हा दिले जाणार याबाबत कृषी विभागाने एक वेळापत्रकच जारी केले आहे. मात्र, हा निर्णय कपाशीबाबतच का असा सवालही उपस्थित केला जात आहे. पण कपाशीचा पेरा वेळेपूर्वी झाला तर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढतो. शिवाय इतर पिकांवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ऐन वेळी बियाणे बाजारात दाखल झाले तर ते योग्य होईल. त्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव तर कमी होईलच पण इतर पिकांचे तरी नुकसान होणार नाही. मात्र, यामुळे कमी कालावधीत बियाणे विक्री करताना अनियमितता होईल अशी शंका देखील उपस्थित होत आहे.
उशिरा पेरणी करुनही बोंडअळीचा प्रादुर्भाव होतोच
कपाशीची लागवड उशिरा काय आणि लवकर काय यामुळे अळीचा प्रादुर्भाव व्हायचा तो होणारच आहे. त्यामुळे उशिरा पेरणी करुन अळीचा प्रादुर्भाव होणार नाही याबाबत कृषी विभागाने स्पष्ट करावे मग 1 जूनला विक्रीची परवानगी दिली तरी चालेल अशी भूमिका विक्रेत्यांनी घेतली आहे. पण याबाबत कृषी विभागाने भूमिका स्पष्ट केली नाही. तर कपाशीचे बियाणे केव्हा विकावे याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा आणि याबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी केली आहे.
असे आहे कपाशी बियाणांचे नियोजन
हंगामाच्या अगोदरच बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकरी त्याची लागवड करतात. म्हणून बियाणे पुरविण्याचा एक कालावधी ठरविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बियाणांची उत्पादकता होते तेथून वितरकांपर्यंत 1 ते 10 मे दरम्यान बियाणे पुरविले जाणार आहे. तर वितरकांकडून 15 मे पासून किरकोळ विक्रत्यांना पुरविले जाणार आहे तर किरकोळ विक्रत्यांकडून शेतकऱ्यांना 1 जून नंतर विक्री केले जाणार आहे.